आज सुरु झालेल्या टी-२० विश्वचषकात उद्या एक अत्यंत महत्वाचा सामना रंगणार आहे. तो म्हणजे भारत-पाकिस्तान सामना. भारत पाकिस्तान सामना म्हणल्यावर अनेक प्रसंग आणि खेळाडूंमधील मैदानातील वाद समोर येतेय. आजवर पाकिस्तानने भारताला कोणत्याही विश्वचषक सामन्यात एकाही हरवलेले नाही. भारत-पाकिस्तान सामन्याच्या, वेंकटेश प्रसाद-आमिर सोहेल, गौतम गंभीर-कामरान अकमल, गौतम गंभीर-शाहिद आफ्रिदी, हरभजन सिंग- शोएब अख्तर, जावेद मियांदाद- किरण मोरे अशी अनेक उदाहरणं सहज डोळ्यासमोर येतात.
१९९६ चा क्रिकेट विश्वचषक. ‘भारत आणि पाकिस्तान नॉक-आउट सामना’. बेंगळुरू मधील चिन्नास्वामी स्टेडियममध्ये ३५,००० लोकांची गर्दी पण सर्वत्र शांतता. कारण भारताकडून वेंकटेश प्रसाद, जवागल श्रीनाथ, अनिल कुंबळे सारखे गोलंदाज खेळत असूनही आमीर सोहेल आणि सईद अन्वर यांची आक्रमक फटकेबाजी. त्यांच्या फलंदाजीमुळे २८७ धावांचे लक्ष देखील कमी वाटायला लागले होते आणि त्यात आमीर सोहेल याने वेंकटेश प्रसाद यांना चौकार लगावला आणि परत तिथेच चौकार मारेन असे स्लेजिंग केलं आणि वेंकटेश प्रसाद यांच्या त्याच ओव्हरच्या अगदी पुढच्याच चेंडूवर आमीर सोहेल ‘क्लीन बोल्ड’.
हे ही वाचा:
मास्क न घालणारे राज ठाकरेच कोरोनाग्रस्त
अखेर फैजाबाद स्थानकही बनले अयोध्या
‘या’ राज्यात काँग्रेस सरकार करणार मदरशांचा ९० टक्के खर्च
काय आहे भारताची ‘अभ्यास’ मिसाईल?
व्यंकटेश प्रसाद यांनी याचवर्षी २ एप्रिल रोजी न्यूज डंकाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हाच किस्सा सांगितला आहे. ही मुलाखत सविस्तर बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा…