मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या विस्तारित इमारतीचे ‘ब’ आणि ‘क’ टप्प्याचे उद्घाटन आज शनिवारी देशाचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. त्यानिमित्त मुख्यमंत्री हे औरंगाबादमध्ये आहेत त्यावरूनच भाजप उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी ट्विट करत मुख्यमंत्र्यांना औरंगाबादमधील नुकत्याच घडलेल्या सामुहिक बलात्कार पिडीत परिवाराची भेट घेण्याचे सुचवले आहे.
‘मुख्यमंत्रीजी औरंगाबाद जिल्ह्यात आहात, तर पैठणच्या तोंडोळी गावाला जरूर भेट देत परवाच्या सामुहिक बलात्कार पीडित परिवाराची भेट घ्या. त्या २० दिवसाच्या चिमुकलीची भेट घ्या जिच्या हाताला नराधमांनी चटके दिलेत. कुटुंबप्रमुखांच्या भेटीने त्यांना नक्की दिलासा मिळेल व आर्थिक मदत ही’ असे ट्विट चित्रा वाघ यांनी केले आहे.
मुख्यमंत्री जी
औरंगाबाद जिल्ह्यात आहात तर पैठण च्या तोंडोळी गावाला जरूर भेट देतं परवाच्या सामुहिक बलात्कार पिडीत परीवाराची भेट घ्या..त्या २० दिवसाच्या चिमुकलीची भेट घ्या जिच्या हाताला नराधमांना चटके दिलेत
कुटुंबप्रमुखांच्या भेटीने त्यांना नक्की दिलासा मिळेल व आर्थिक मदत ही 🙏 https://t.co/r1l38MJMBU
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) October 23, 2021
पैठण तालुक्यातील तोंडाळी गावातील शेतवस्तीवर बुधवारी (२० ऑक्टोबर) मध्यरात्री एक धक्कादायक घटना घडली होती. दोन महिलांवर सामुहिक बलात्कार केल्याची धक्कादायक आणि संतापजनक घटना घडली होती. त्यावरूनही चित्रा वाघ यांनी संजय राऊत आणि महाविकास आघाडी सरकार यांच्यावर टीकेची तोफ डागली होती.
हे ही वाचा:
दुबई-जम्मू-काश्मीर करार हे भारतासाठी मोठे यश
…तर ऐन दिवाळीत एसटी कर्मचारी करणार आंदोलन
ICC Men’s T20 WC: आजपासून रंगणार ‘सुपर १२’ चे धुमशान
काय आहे भारताची ‘अभ्यास’ मिसाईल?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या भाषणात अनेक विषयावर भाष्य केले आहे. न्यायव्यवस्थेच्या परिस्थितीबाबत त्यांनी आपली मते मांडली. न्यायव्यवस्थेत बदल व्हावेत, हे सांगताना देशातले कोर्ट रिकामे पडले पाहिजेत, अशी परिस्थिती निर्माण व्हायला हवी, अशीही अपेक्षा व्यक्ती केली आहे.