22 C
Mumbai
Friday, January 10, 2025
घरराजकारणअमित शहा आजपासून काश्मीर दौऱ्यावर

अमित शहा आजपासून काश्मीर दौऱ्यावर

Google News Follow

Related

केंद्रिय गृहमंत्री अमित शहा आजपासून तीन दिवसांच्या जम्मू काश्मीर दौऱ्यावर जाणार आहेत. कलम ३७० आणि ३५ अ हटवल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री प्रथमच जम्मू काश्मीर दौऱ्यावर जात आहेत. गृहमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण काश्मीरमध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. आयबी, एनआयए, लष्कर, सीआरपीएफचे वरिष्ठ अधिकारी सध्या जम्मू-काश्मीरमध्ये असल्याचे सांगण्यात येत आहे. अधिकारी प्रत्येक गोपनीय माहितीवर बारकाईने लक्ष ठेवत आहेत. या भेटीत गृहमंत्री अमित शहा काश्मीरमधील सर्व राजकीय पक्षांच्या शिष्टमंडळांसह स्थानिक सामाजिक संस्था आणि व्यापारी संघटनांना भेटतील आणि काश्मीरच्या विकासावर चर्चा करतील.

अमित शहा यांचा हा दौरा आणखी महत्त्वाचा ठरणार आहे, कारण गेल्या एका महिन्यात दहशतवाद्यांनी दहशत निर्माण करण्यासाठी सामान्य बिगर काश्मिरी नागरिकांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये ११ निष्पाप नागरिकांची हत्या करण्यात आली आहे. गृहमंत्री शहा यांनी काश्मीरचा दौरा करू नये यासाठी दहशतवादी संघटना अधिक सक्रिय झाल्या असे बोलले जात आहे. पण गृहमंत्री शहा यांनी या भेटीबाबत अधिक सक्रियता दाखवली आहे. यासोबतच सुरक्षा यंत्रणांना दहशतवादी संघटनांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या. परिणामी गेल्या १५ दिवसांत १३ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात लष्कराला यश आले आहे.

अमित शहा यांच्या दौऱ्यानिमित्त श्रीनगरमध्ये कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आली आहे. ड्रोन, कॅमेरे यांच्या माध्यमातून संपूर्ण परिसरात लक्ष ठेवण्यात आले असून रस्त्यांवरही कडेकोट सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. प्रत्येक गुप्तचर माहितीवर लक्ष ठेवण्यात आले आहे. नागरिकांच्या हत्येनंतर आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या श्रीनगर दौऱ्यापर्यंत सुरक्षेच्या दृष्टीने जम्मू- काश्मीरमध्ये सुमारे ७०० लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे.

हे ही वाचा:

…तर ऐन दिवाळीत एसटी कर्मचारी करणार आंदोलन

ICC Men’s T20 WC: आजपासून रंगणार ‘सुपर १२’ चे धुमशान

काँग्रेसच्या सभेबाहेर शेतकरी सांगतात आमचे मत भाजपालाच

संघाची बदनामी जावेद अख्तरांना भोवणार? फौजदारी तक्रार दाखल

जम्मू आणि काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० आणि ३५ अ ५ ऑगस्ट २०१९ रोजी रद्द करण्यात आले. तेव्हापासून सर्वांच्या नजरा गृहमंत्री अमित शहा यांच्या काश्मीर दौऱ्यावर होत्या. वेळ आल्यावर काश्मीरला भेट देणार असल्याचेही शहा म्हणाले होते. गेल्या दोन महिन्यांत ५० हून अधिक केंद्रीय मंत्र्यांनी जम्मू -काश्मीरच्या विविध जिल्ह्यांचा दौरा केला. सोबतच केंद्र सरकारच्या योजनांचा आढावा घेतला. अमित शहा २३ ते २५ ऑक्टोबर दरम्यान काश्मीरमध्ये असतील. श्रीनगरमधील शेर-ए-काश्मीर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटरमध्ये (SKICC) विविध राजकीय पक्षांच्या शिष्टमंडळ, काश्मीर ट्रान्सपोर्ट असोसिएशन, हाऊस बोट असोसिएशन, काश्मीर चेंबर्स ऑफ कॉमर्स, सुरक्षा संस्था आणि काश्मीर सरकारमधील अधिकाऱ्यांसोबत ते बंद खोलीत चर्चा करतील. तर २४ ऑक्टोबरला ते जम्मूमध्ये भाजपच्या रॅलीला संबोधित करतील.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा