हायपरसॉनिक क्षेपणास्त्रे विकसित करणाऱ्या काही निवडक देशांमध्ये भारताचा समावेश आहे. एका स्वतंत्र अहवालात असे म्हटले आहे की, चीनने अलीकडेच अण्वस्त्र सज्ज हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची चाचणी केली ज्याने आपले लक्ष्य भेदण्यापूर्वी पृथ्वीभोवती प्रदक्षिणा मारली आणि प्रगत अवकाश क्षमता दाखवून दिली. या घटनेने अमेरिकन गुप्तचरांना आश्चर्यचकित केले.
स्वतंत्र कॉग्रेशनल रिसर्च सर्व्हिस (सीआरएस) ने या आठवड्यातील ताज्या अहवालात म्हटले आहे की अमेरिका, रशिया आणि चीनकडे अत्याधुनिक हायपरसॉनिक शस्त्रास्त्र कार्यक्रम असले तरी ऑस्ट्रेलिया, भारत, फ्रान्स, जर्मनी आणि जपानसह इतर अनेक देश, हायपरसॉनिक शस्त्रे तंत्रज्ञान देखील विकसित करीत आहेत.
ऑस्ट्रेलियाने अमेरिकेसोबत सहकार्य केले आहे, तर भारताने रशियासोबत सहकार्य केले आहे, असे सीआरएसने आपल्या अहवालात म्हटले आहे.
सीआरएसच्या अहवालात म्हटले आहे की, ब्रह्मोस २, माक ७ हायपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राच्या विकासासाठी भारताने रशियासोबत सहकार्य केले आहे.
“जरी ब्रह्मोस २, २०१७ च्या सुरवातीला वापरात आणण्याचा हेतू असला तरी, या क्षेपणास्त्राच्या विकासासाठी लक्षणीय विलंब होत आहे आणि आता २०२५ किंवा २०२८ दरम्यान प्रारंभिक कार्यक्षमता प्राप्त करण्याचे नियोजन आहे.
सीआरएसने म्हटले आहे की, “भारत आपल्या हायपरसॉनिक टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेटर व्हेईकल प्रोग्रामचा एक भाग म्हणून स्वदेशी, दुहेरी-सक्षम हायपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र विकसित करत आहे आणि जून २०१९ आणि सप्टेंबर २०२० मध्ये माक ६ स्क्रॅमजेटची यशस्वी चाचणी भारताने केली आहे.”
हे ही वाचा:
अखिलेश यादव आणि तुकडे तुकडे गॅंगची हातमिळवणी
चीनमध्ये पुन्हा लॉकडाऊन, कोविड केसेस पुन्हा वाढल्या
करी रोडमधील अविघ्न पार्क इमारतीला भीषण आग
पवारांच्या शागिर्दाने १५ हजार कोटी रुपये लुटले
भारत अंदाजे १२ हायपरसोनिक टेस्टिंग साईट्स असून माक १३ पर्यंतच्या गतीची चाचणी घेण्यास भारत सक्षम आहे. असे अमेरिकन काँग्रेसच्या सदस्यांसाठी स्वतंत्र विषय क्षेत्र तज्ज्ञांनी तयार केलेल्या काँग्रेसने दिलेल्या अहवालात म्हटले आहे.