हरयाणातील कुंडली सीमेवर पुन्हा एकदा निहंगांची दहशत दिसून आली. त्यांनी तिथे मारहाण करत एका चालकाचा पाय मोडला.
घडलं असं की, संबंधित रिक्षा ड्रायव्हर तिथून, रिक्षामध्ये कोंबडा घेऊन जात होता. निहंगांनी त्याला थांबवले आणि त्याला कोंबडा दे असे म्हटले. परंतु त्या ड्रायव्हरने देण्यास नकार दिला. त्याने त्याची यामागची कारणेही सांगितली. परंतु क्रूर निहंगांनी त्याचे काहीच ऐकले नाही. त्यांनी चालकावर आणि त्याच्या साथीदारावर कुऱ्हाड तसेच काठ्यांनी हल्ला केला. यामध्ये चालक गंभीर जखमी झाला. त्याचा एक पाय मोडला होता, तर त्याच्या साथीदारालाही गंभीर दुखापत झाली होती. सध्या या प्रकरणी पोलिसांनी एका निहंगला अटक केली आहे. तो बाबा अमन सिंह जमातचा असल्याचे सांगितले जात आहे.
जखमी चालक मनोज पासवान याने पोलिसांना सांगितले की तो मूळचा बिहारचा आहे. तो एका कोंबडीच्या दुकानात काम करतो आणि दुपारी चिकनचा पुरवठा करतो. तो सीमेवरून सिंह पोल्ट्री फार्मकडे रिक्षामध्ये चिकन लोड करून हॉटेलांना पुरवण्यासाठी जात होता. निहंगांनी त्याला आंदोलनाच्या ठिकाणाजवळ थांबवले आणि कोंबडा मागण्यास सुरुवात केली. त्याने नकार दिल्यावर त्यांनी त्याच्यावर कुऱ्हाडी आणि काठ्यांनी हल्ला केला. त्याच्यासोबत त्याने साथीदार पप्पूलाही मारहाण केली.
हे ही वाचा:
बिल गेट्स का पडले मोदी आणि भारतीय लसीकरण मोहिमेच्या प्रेमात?
अविघ्न पार्क आगीवरून पेटला वाद! नेमके दोषी कोण?
मुख्यमंत्री महोदय, नितीन राऊत यांच्याविरोधात एफआयआरचा आदेश द्या!
१०० कोटी लसीकरण हे नव्या भारताचे चित्र
नंतर पोलिसांनी एका निहंगला अटक केली. नवीन संघू असे त्याचे नाव आहे. तो कर्नालचा रहिवासी आहे. असे सांगितले जात आहे की तो काही महिन्यांपूर्वीच निहंग झाला. अलीकडेच ३५ वर्षीय व्यक्तीला येथे निहंगांनी ठार मारले कारण त्याने गुरु ग्रंथ साहिबचा अपमान केल्याचा दावा केला जात होता. त्याचा एक व्हिडिओही व्हायरल झाला. या प्रकरणी चार निहंगांना अटक करण्यात आली होती.