22 C
Mumbai
Tuesday, December 24, 2024
घरराजकारण‘शिवशाही’चं वचन देणा-यांनी ‘निजामशाही’ आणलीय’

‘शिवशाही’चं वचन देणा-यांनी ‘निजामशाही’ आणलीय’

Google News Follow

Related

पैठण तालुक्यातील तोंडाळी गावातील शेतवस्तीवर बुधवारी मध्यरात्री एक धक्कादायक घटना घडली आहे. वस्तीवर दरोडेखोरांनी केवळ लूट केली नाही तर दोन महिलांवर सामुहिक बलात्कार केल्याची धक्कादायक आणि संतापजनक घटना घडली आहे. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरु केला असून अद्याप आरोपींचा शोध लागलेला नाही. दरम्यान भाजपच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी आज पीडित महिलांची भेट घेत, त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. यावेळी चित्रा वाघ यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि महाविकास आघाडी सरकारवर टीकेची तोफ डागली आहे.

‘१५ दिवसाची बाळांतीण आणि आठ महिन्यांच्या गर्भवतीवर बलात्कार झालाय.. अन् संजय राऊतांची लेखणी महिला संरक्षणाऐवजी भ्रष्टाचाऱ्यांच्या रक्षणासाठी परजतेय, कदाचित उच्च प्रतीच्या गांजाची नशा अजून उतरली नसल्याने संजय राऊत यांच्या पर्यंत औरंगाबाद महिला अत्याचाराची घटना पोहोचली नसेल.’ अशा शब्दात चित्रा वाघ यांनी संजय राऊतांवर टीका केली आहे.

मंगळवारी (१९ ऑक्टोबर) रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास सात ते आठ दरोडेखोरांनी शेत वस्तीवर हल्ला करत वस्तीवर असलेल्या पुरुषांना चाकू आणि कुऱ्हाडीचा धाक दाखवत बांधून ठेवले. तसेच कुऱ्हाडीच्या दांड्याने त्यांना जबर मारहाणही केली. त्यानंतर एका २३ वर्षीय आणि एका ३० वर्षीय महिलेवर चार दरोडेखोरांनी सामूहिक बलात्कार केला. यानंतर घरातली रोख रक्कम आणि मोबाईल घेऊन दरोडेखोर पसार झाले.  या घटनेने पैठण हादरले असून पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

हे ही वाचा:

पवारांच्या शागिर्दाने १५ हजार कोटी रुपये लुटले

सोशल मीडियामध्ये येणार नवे ‘ट्रम्प’कार्ड

आंदोलकांना रस्ते अडवण्याचा अधिकार नाही

केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोदी सरकारकडून मोठी भेट

‘औरंगाबाद पैठण तालुका तोंडोळी गावच्या घटनेवरून आपण निजामाच्या राजवटीत राहतोय का हा प्रश्न पडलायओल्या बाळंतीणवर बलात्कार, गर्भवतीवर अत्याचार. दरोडेखोर मोकाट.. उरला नाही कायद्याचा धाक.. ‘शिवशाही’चं वचन देणा-यांनी ‘निजामशाही’ आणलीय’ असा टोलाही चित्रा वाघ यांनी सरकारवर लगावला आहे.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा