नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (एनसीबी) अधिकारी बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेच्या घरी आज (२१ ऑक्टोबर) पोहोचले. ड्रग्स प्रकरणाच्या चौकशीसाठीचे समन्स देण्यासाठी एनसीबीचे अधिकारी अनन्या पांडे हिच्या घरी पोहोचले होते. अधिकाऱ्यांनी अनन्या पांडेच्या घरी जाऊन तिला समन्स दिले आहेत. ज्या बॉलिवूड अभिनेत्रीबद्दल आर्यन खानच्या व्हाॅट्सॲप चॅटमध्ये बोलले जात होते, ती अनन्या पांडे होती का, असा सवाल आता उपस्थित झाला आहे. सध्या एनसीबीने अनन्या पांडेला आज दुपारी २ वाजता ड्रग्ज प्रकरणात चौकशीसाठी बोलावले आहे.
Mumbai | A team of Narcotics Control Bureau arrives at the residence of actor Ananya Pandey. A team of NCB is also present at Shah Rukh Khan's residence
Visuals from Ananya Pandey's residence pic.twitter.com/U5ssrIxpph
— ANI (@ANI) October 21, 2021
दरम्यान एक एनसीबीचे पथक अभिनेता शाहरुख खानच्या मन्नत बंगल्यावर पोहचली असून तिथे सर्च ऑपरेशन सुरू आहे. आर्यन खान अटक प्रकरणानंतर एनसीबीने आपली कारवाई आणखी तीव्र केली आहे.
Mumbai | A team of Narcotics Control Bureau (NCB) is currently present at actor Shah Rukh Khan's residence 'Mannat'
Earlier today, Shah Rukh Khan met son Aryan at Arthur Road Jail
Bombay High Court to hear Aryan Khan's bail application on 26th October pic.twitter.com/SyzoWVi9UL
— ANI (@ANI) October 21, 2021
मुंबईच्या विशेष न्यायालयाने बुधवारी (२१ ऑक्टोबर) अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचा जामीन अर्ज फेटाळला होता. आर्यन खानची याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. मात्र, आता या याचिकेवर सुनावणी मंगळवारी (२६ ऑक्टोबर) होणार असून अजून चार दिवस आर्यन खानचा तुरुंगातील मुक्काम वाढला आहे.
हे ही वाचा:
मंगळवार पर्यंत आर्यन खान तुरुंगातच
लसीकरणाच्या ऐतिहासिक क्षणाला १०० वारसा स्थळांना चढणार तिरंग्याचा साज!
कौसा रुग्णालयाचा खर्च वाढता वाढता वाढे! २७ कोटींवरून १४७ कोटी
क्रूझवरील पार्टी प्रकरणात एनसीबीने आर्यन खानला अटक केली होती. क्रूझवरील ड्रग्स पार्टी उधळत एनसीबीने आठ जणांना ताब्यात घेतले होते. चौकशीनंतर त्यातील तीन जणांवर अटकेची कारवाई करण्यात आली होती. त्यात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान, त्याचा मित्र अरबाज मर्चंट आणि मूनमून धामेचा यांचा समावेश होता.