30 C
Mumbai
Monday, November 25, 2024
घरराजकारणमिनी महाविकास आघाडीने केली घटनेची मोडतोड?

मिनी महाविकास आघाडीने केली घटनेची मोडतोड?

Google News Follow

Related

मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयासारख्या एका शंभरी ओलांडलेल्या संस्थेची २४ ऑक्टोबरला होणारी निवडणूक घटनेची मोडतोड करून जिंकण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप केला जात आहे. उमेदवारांना मत देण्याचा अधिकार नाही, तीनऐवजी नियमबाह्य पद्धतीने पाच वर्षांसाठी कार्यकारिणीची मुदत ठेवण्यात आली आहे, सदस्यांना मतदानाचा अधिकार न देता केवळ संस्थेच्या शाखांमधील ३४ प्रतिनिधींना मतदानाचा अधिकार अशी नियमांची पायमल्ली निवडणुकीत होत आहे. विशेष म्हणजे या संस्थेत राज्यातील महाविकास आघाडीतील तीन सदस्य पक्षांतील काही नेते, समर्थकच सहभागी असल्यामुळे एकप्रकारे या घटनाबाह्य निवडणुकीला त्यांचे पाठबळ आहे, असा आरोप केला जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार हे या संस्थेचे १९९२पासून अध्यक्ष आहेत आणि प्रथमच या संस्थेची निवडणूक होत आहे. संस्थेची गेल्या १२३ वर्षांत झालेल्या बिकट अवस्थेमुळे व्यथित झालेल्या काही सदस्यांनी आता सगळे बदलायला हवे या भावनेतून शरद पवार प्रणित कार्यकारिणी विरोधात दंड थोपटले आहेत. धनंजय शिंदे हे शरद पवार यांच्या विरोधात अध्यक्षपदासाठी उभे राहिले आहेत. राजकीय निवडणुकांतून बाहेर पडलेले शरद पवार मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयासारख्या एका संस्थेच्या निवडणुकीत का रस घेत आहेत, असा सवालही उपस्थित केला जात आहे.

धनंजय शिंदे यांनी ही मिनी महाविकास आघाडी घटनाबाह्य पद्धतीने निवडणूक घेत असल्याचा आरोप केला आहे. स्वतः शरद पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेतच पण त्यांच्या कार्यकारिणीत शिवसेना, काँग्रेसचेही समर्थक असल्यामुळे ही मिनी महाविकास आघाडीच या संस्थेला मुठीत ठेवू पाहात मिनी महाविकास आघाडीने केली घटनेची मोडतोड? आहे, असा त्यांचा आरोप आहे.

हे ही वाचा:

देशमुख, परमबीर गेले हनिमूनला?

आज की बार, १०० करोड पार

जरंडेश्वर प्रकरणी सोमैय्यांची ईडीकडे तक्रार

मुंबईच्या फुटपाथवरून जप्त केले २१ कोटीचे हेरॉईन आणि महिलेला केले जेरबंद

ते म्हणतात, संस्थेच्या तीन घटना असून त्या १९८४, १९८९ आणि २०१३ अशा तीन वर्षातल्या आहेत. त्यातील २०१३च्या घटनेला मान्यता नाही. पण जी घटना अधिकृत आहे त्यातही सगळ्या सदस्यांना मतदानाचा अधिकार असल्याचे म्हटले आहे. पण या निवडणुकीत मात्र उमेदवारांना मतदानाचा अधिकारच देण्यात आलेला नाही. शिंदे यासंदर्भात म्हणतात की, हा तर गिनिज बुकमधील एक विश्वविक्रम आहे. कोणत्याही निवडणुकीत उमेदवारासह प्रत्येक पात्र मतदाराला मतदानाचा अधिकार असतो. पण मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयात उमेदवार मतदान करू शकत नाही.

ते म्हणाले की, दुसरी घटनाबाह्य गोष्ट म्हणजे या निवडणुकीसाठी कार्यकारिणीचा कार्यकाळ तीन वर्षांचा आहे; पण तो आता पाच वर्षांचा करण्यात आला आहे. त्यासाठी कोणतीही विशेष सभा घेऊन हा नियम तयार करण्यात आलेला नाही. त्यामुळे आपापल्या मर्जीनुसार सगळे नियम आखले जात आहेत.

यासंदर्भात निवडणूक अधिकारी, धर्मादाय आयुक्त यांच्याही निदर्शनास ही बाब आणली आहे. ही निवडणूक पुढे ढकलावी अशीही मागणी करण्यात आली आहे, पण या तक्रारी, मागण्यांना दाद देण्यात येत नाही. मात्र ही परिस्थिती बदलण्यासाठी आता आम्ही जय्यत तयारीनिशी उतरणार आहोत.

निवडणुकीत उभे असलेले उमेदवार असे
अध्यक्षपद (पद १) उमेदवार-
शरद पवार, धनंजय शिंदे
उपाध्यक्ष (पदे ७) उमेदवार
प्रदीप कर्णिक, संतोष कदम, प्रमोद खानोलकर, विद्या चव्हाण, रजनी जाधव, प्रभाकर नारकर, अमला नेवाळकर, झुंझार पाटील, आनंद प्रभू, शशी प्रभू, संजय भिडे, भालचंद्र मुणगेकर, अरविंद सावंत, सुधीर सावंत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
197,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा