गोल्डमन सॅक्सच्या मते भारतीय आय.टी. क्षेत्रात पुन्हा एकदा चांगले दिवस येण्याची शक्यता आहे. कोरोना महामारीमुळे लोकांना कुठूनही काम करण्याची मुभा देण्यात आल्यामुळे मागील काळात आय.टी क्षेत्रातील कंपन्यांना सुगीचे दिवस आले आहेत.
गोल्डमन सॅक्समधील विश्लेषक सुमित जैन आणि सौरभ थादानी यांच्या सांगण्यानुसार यापुर्वीच्या दोन मोठ्या संकटांनंतर आय.टी क्षेत्रात भरभराट झालेली पहायला मिळाली होती. त्यामुळे आताही या क्षेत्रात मोठी वाढ अपेक्षित आहे.
आधुनिक तंत्रज्ञानाचा आय.टी क्षेत्राला फायदा झाला आहे. क्लाऊड तंत्रज्ञानाचा या क्षेत्रात खूप वापर होताना पाहिला जात आहे. आय.टी क्षेत्रातील कंपन्या आणि ग्राहकांकडून सेवा देण्या-घेण्याच्या पध्दतीत मोठाच बदल झाला आहे. त्यामुळे आर्थिक वर्ष २२-२३ मध्ये या क्षेत्रात १३.१ टक्क्याची वाढ अपेक्षित असून ९.७ टक्के वाढ भारतीय तंत्रज्ञान कंपन्यांत अपेक्षित आहे.
या तिसऱ्या लाटेचा भारतातील आय.टी धुरीणांना फायदा अपेक्षित आहे.