राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या मांडीला मांडी लावून सत्तेत आल्यानंतर शिवसेनेने गेल्या दीड-दोन वर्षांत हिंदू सणांबाबतची आपली भूमिका बदलल्याची चर्चा होऊ लागली आहे. १९ ऑक्टोबरला असलेल्या ईद ए मिलादसाठी मिरवणूक काढण्याची परवानगी ठाकरे सरकारने दिली असून गणेशोत्सवात मात्र कोणत्याही विसर्जन अथवा आगमन मिरवणुका काढायच्या नाहीत, असा आदेश काढण्यात आला होता. नुकत्याच झालेल्या नवरात्रीतही गरब्याला सार्वजनिक ठिकाणी कुठेही परवानगी देण्यात आली नव्हती. त्यामुळे सरकारच्या आदेशाबद्दल आता सर्वसामान्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
या आदेशानुसार मुस्लिम धर्मियांच्या ईद ए मिलाद या सणासाठी मुंबई शहर आणि मुंबई उपनगर याठिकाणी प्रत्येकी एक मिरवणूक काढता येईल, असा आदेश मुंबई पोलिस आयुक्तांनी काढला आहे. त्यात म्हटले आहे की, या मिरवणुकांत प्रत्येकी ५ ट्रक आणि प्रत्येक ट्रकमध्ये ५ माणसे अशी परवानगी असेल.
या ट्रकमधील लोकांनी कोरोना नियमांनुसार मास्क परिधान करणे आणि सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक असेल. इतर कोणत्याही मिरवणुकांना यादरम्यान मात्र मनाई करण्यात आली आहे. एकूणच अशा मिरवणुका काढण्यासाठी राज्य सरकारने हिरवा कंदिल दाखविला आहे.
All processions on Eid-e-Milad prohibited, except one procession in Mumbai City district & one in Mumbai Suburban district of 5 trucks per procession with a max of 5 persons on each truck, with the prior permission of Police: Office of the Commissioner of Police, Greater Mumbai pic.twitter.com/xCpwVDncOT
— ANI (@ANI) October 18, 2021
हे ही वाचा:
दहिसरमध्ये नागरिकांना भीती डासांच्या कारंज्याची
खासगी इलेक्ट्रिक बसेसचा बसणार एसटीला शॉक
पवार साहेब, हर्बल तंबाखूच्या लागवडीला परवानगी द्या
अमली पदार्थविरोधी कक्षाला आढळली मानखुर्द, गोवंडी ‘नशेत’
गणेशोत्सवात मात्र गेली दोन वर्षे कोणत्याही मिरवणुकांना परवानगी नाकारण्यात आली होती. त्यानंतर नवरात्रीत गरबा सार्वजनिक स्तरावर कुठेही खेळता येणार नाही, असेही आदेश काढण्यात आले होते. त्यामुळे हिंदुधर्मियांमध्ये नाराजीचे वातावरण होते. दहिहंडी उत्सवावरही कोरोनाच्या नियमांचे निर्बंध होते. त्यामुळे हा उत्सवही सार्वजनिक स्तरावर साजरा करण्यात आला नाही. दसऱ्याच्या निमित्तानेही मिरवणुका काढल्या गेल्या नाहीत. दुसरीकडे सरकारी कार्यक्रम मात्र जोरात साजरे केले गेले. तिथे कोरोनाच्या नियमांची पायमल्ली केली गेली.