एसटी महामंडळाच्या ताफ्यात आता लवकरच दोन हजार इलेक्ट्रिक गाड्या दाखल होणार आहेत. पण या एसटी बस दाखल होण्यापूर्वीच खासगी इलेक्ट्रिक बसेस रस्त्यावर धावू लागल्यामुळे एसटीच्या बसेसकडे प्रवासी कसे वळणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.
इव्हेक्ट्रान्स कंपनीने सुरत, सिल्वासा, गोवा, डेहरादूननंतर आता पुणे-मुंबई महामार्गावर धावणारी खासगी इलेक्ट्रिक बस वाहतुकीसाठी आणली आहे. गेल्यादोन दिवसांपासून ही बस मुंबई पुणे अशी प्रवास करत आहे. त्यामुळे एसटीच्या ताफ्यातील इलेक्ट्रिक बस गाड्यांचे सध्या फक्त निविदांवरच घोडे रखडले आहे. महामंडळाच्या इलेक्ट्रिक बस रस्त्यावर येण्याआधीच खासगी बस धावायलाही सुरुवात झालेली आहे. त्यामुळेच भविष्यामध्ये येणारी महामंडळाची इलेक्ट्रिक बसच्या भवितव्यावर आता प्रश्न निर्माण झालेला आहे.
सध्याच्या घडीला राज्यामध्ये महामंडळाकडून २ हजार इलेक्ट्रिक बस आणण्याचा प्रयत्न सुरु आहे. परंतु किचकट नियम तसेच अटींमुळे अजूनही निविदांना कंपन्यांकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळेच आणखी दीड वर्षांचा कालावधी महामंडळाच्या इलेक्ट्रिक बसना लागणार असे म्हटले जात आहे.
हे ही वाचा:
‘जश्न-ए-रिवाज’च्या षड्यंत्राविरुद्ध तेजस्वी सूर्या मैदानात
हॉटेलांत आता रात्री १२ पर्यंत लगबग
पवार साहेब, हर्बल तंबाखूच्या लागवडीला परवानगी द्या
अमली पदार्थविरोधी कक्षाला आढळली मानखुर्द, गोवंडी ‘नशेत’
येत्या सहा महिन्यांत पुण्यातून औरंगाबाद, नाशिक, कोल्हापूर, सोलापूर आणि महाबळेश्वर या मार्गांवर ई-बसद्वारे सेवा दिली जाणार आहे. आता यापुढे जाऊन एसटी महामंडळ ताफ्यात दोन हजार ई-बसचा समावेश करण्याबाबत गांभीर्याने विचार सुरू आहे. पहिल्या टप्प्यात ई-बसच्या दीडशे फेऱ्यांसाठीचे मार्ग निश्चित करण्यात आले आहेत. त्याबरोबरच जादा प्रवासी असलेल्या आणि ई-बस चालवणे शक्य असलेल्या मार्गांची आखणी करून फेऱ्यांचे नियोजन करावे, असे महामंडळाच्या वाहतूक विभागाने सर्व विभाग नियंत्रकांना कळवले होते. त्यानुसार अनेक विभागांनी मार्ग निश्चित करून माहिती पाठवली देखील आहे.