मातोश्री प्रॉपर्टीजचे राजन शिरोडकर, आदित्य शिरोडकर यांच्यासह सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पैसे देऊन फ्लॅटचा ताबा न देता फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
आर ए के किडवई मार्ग पोलीस ठाण्यात हा फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मेसर्स मातोश्री प्रॉपर्टीजचे राजन गणेश शिरोडकर, आदित्य राजन शिरोडकर यांच्यासह आशुतोष अभ्यंकर, विजय येवलेकर, सुरेश गुप्ता आणि प्रफुल मेहता यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आले आहे. परळ परिसरात असणाऱ्या मातोश्री प्राईड इमारतीत पैसे घेऊनही फ्लॅटचा ताबा न दिल्याचे हे प्रकरण आहे.
हे ही वाचा:
सहा गाड्या धडकल्या; तीन मृत्यू
‘संजय राऊत यांचे गांजावर इतके प्रेम बरे नाही!’
नटवर सिंह म्हणतात, काँग्रेसला मिळतील पाचपैकी शून्य
फिर्यादीने आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्यांची तब्बल १ कोटी ९७ लाख १५ हजार रुपयांची फसवणूक झाली आहे. वारंवार मागणी करूनही फ्लॅटची ओसी व ताबा दिला नाही, अशी तक्रार यापूर्वी करण्यात आली होती. त्यावरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २०१७ पासून वारंवार पैसे घेऊन फसवणूक केल्याचा फिर्यादीने आरोप केला आहे.
आदित्य शिरोडकर यांनी नुकताच मनसेला रामराम ठोकून शिवसेनेत प्रवेश केला आहे. मनसेत विद्यार्थी सेनेतील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले जात नाही. आमच्याशी संवाद न साधता विद्यार्थी सेना काम करत नाही असे मीडियाला सांगण्यात आल्याचा आरोप आदित्य शिरोडकर यांनी त्यावेळी केला होता.
आरोपींनी सामायिक इराद्याने जी डी आंबेकर मार्ग, परेल, मुंबई येथील मातोश्री प्राईड इमारती मधील १८ व्या मजल्यावरील फ्लॅट क्र २००३ चे ३१ मे २०१७ पर्यंत ओ सी सर्टिफिकेट प्राप्त करून फिर्यादी धनंजय दौंड यांना पजेशन देणेबाबत करार केला. फिर्यादी यांचे कडून सदर फ्लॅट खरेदीचे एकूण एक कोटी ९७ लाख १५ हजार १८ रुपये घेऊन त्यांना नमूद फ्लॅटची ओ सी व पजेशन दिले नाही आणि त्यांची फसवणूक केली. तसेच नमूद प्रोजेक्ट मधील फ्लॅट खरेदीदाराकडून फ्लॅट विक्री निमित्त गोळा केलेल्या पैश्याचा अन्यायाने विश्वासघात करून गैरवापर केला.