30 C
Mumbai
Monday, November 25, 2024
घरदेश दुनिया...आणि जयदेव सिंहला मिळाले पुन्हा दोन हात!

…आणि जयदेव सिंहला मिळाले पुन्हा दोन हात!

Google News Follow

Related

मुंबईतील ग्लोबल हॉस्पिटलमध्ये नुकतीच दोन्ही हात प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली. २२ वर्षांचे जयदेव सिंह यांच्यावर शस्त्रक्रिया पार पडली असून, सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. डॉक्टरांनी सांगितले की, पेशंट अजूनही बेशुद्ध आहेत आणि कोणतीही गुंतागुंत न होता शस्त्रक्रिया उत्तम झाली. जानेवारी २०२० मध्ये, राजस्थानच्या हनुमानगढचा रहिवासी सिंह हा त्यांच्या शेतात बोअरवेलचे काम करत होता. त्यावेळी तो उच्च-दाबाच्या तारेच्या संपर्कात आला. त्याला गंभीर जखमा झाल्या आणि त्याला जयपूरच्या रुग्णालयात हलवावे लागले जेथे त्याचे हात आणि पाय कापण्यात आले.

घटनेनंतर त्याला जयपूर रुग्णालयातून डिस्चार्ज मिळायला जवळपास दोन महिने लागले. जयदेव हा त्यानंतर काही काळ म्हणजे काही वर्षे जागेवरच होता. उत्कृष्ट कबडी खेळणारा जयदेव जागेवर बसल्यावर त्याचा आत्मविश्वास गेला होता. परंतु इंटरनेटच्या माध्यमातून हात यशस्वी रोपण करण्याची शस्त्रक्रिया संदर्भात त्याने माहिती वाचली. त्यानंतर ग्लोबल हॉस्पिटलमध्ये यासंदर्भात चौकशी केली. त्यानंतर जयदेवला मुंबईत संबंधित शस्त्रक्रियेसाठी आणण्यात आले.

 

हे ही वाचा:

पंचाने केली नवाब मलिक यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार

दिलासादायक! गेल्या २४ तासांत मुंबईत एकही कोविड मृत्यूची नोंद नाही

केरळमध्ये पावसाचे तांडव! भुस्खलनामुळे जीवित हानी

राज ठाकरेंच्या नावे खंडणी मागणारे पोलिसांच्या ताब्यात!

 

मुख्य म्हणजे मोनिका मोरेशी जयदेवने यासंदर्भात बोलणी केली होती. मोनिका मोरेवर ग्लोबल रुग्णालयामध्ये पहिली शस्त्रक्रिया करण्यात आली होती. ग्लोबल रुग्णालयाने तिला समुपदेशक म्हणून काम करण्याची संधी दिलेली आहे. त्यामुळेच जयदेवला मोनिकासोबत झालेल्या संभाषणानंतर आत्मविश्वास मिळाला. अहमदाबाद येथे एका ५२ वर्षाच्या व्यक्तीचे निधन झाले होते. याकुटुंबीयांनी समुपदेशनानंतर हात दान करण्याची संमती दिली. डॉ. निलेश सातभाई यांनी ही शस्त्रक्रिया आव्हान असल्याचे म्हटले होते. त्यानंतर ही गुंतागुतींची शस्त्रक्रिया अखेर पार पडली. यासंदर्भात बोलताना, सातभाई म्हणाले, ग्लोबल हॉस्पिटलमध्ये ऑगस्ट २०२० मध्ये मोनिका मोरेच्या हात प्रत्यारोपणानंतर ही एक शस्त्रक्रिया होती. “ही शस्त्रक्रिया थोडी वेगळी आणि गुंतागुंतीची होती. मोनिका मोरेच्या प्रत्यारोपणाचा अनुभव आमच्याकडे होता, त्यामुळे आम्ही यशस्वी होऊ शकलो.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
197,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा