30 C
Mumbai
Monday, November 25, 2024
घरविशेषकेरळमध्ये पावसाचे तांडव! भुस्खलनामुळे जीवित हानी

केरळमध्ये पावसाचे तांडव! भुस्खलनामुळे जीवित हानी

Google News Follow

Related

भारताच्या दक्षिणेला असलेल्या केरळ राज्यात सध्या पावसाचे तांडव सुरु आहे. राज्याच्या अनेक भागात पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर अनेक ठिकाणी धुवाधार पावसाने झोडपून काढले आहे. दरम्यान या पावसामुळे केरळमध्ये भूस्खलनच्या घटना समोर आल्या आहेत. या भूस्खलनात जीवित हानी झाल्याचेही समोर आले आहे. तर सध्या एनडीआरएफच्या तुकड्यां मार्फत बचावकार्य सुरु आहे. आत्तापर्यंत या भुस्खलनामध्ये मृत झालेल्यांचा आकडा १९ असल्याचे समोर आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सर्व घटनांची दखल घेतली असून केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्या सोबत फोनवरून चर्चा केली आहे. केंद्र सरकारकडून अपेक्षित ते सर्व सहकार्य पुरवण्याची तयारी दाखवली आहे. तर भूस्खलनात जीव गमावलेल्या लोकांच्या प्रति शोक व्यक्त करत मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संदर्भात ट्विट करत माहिती दिली आहे.

हे ही वाचा:

‘टोपे साहेब, आता विद्यार्थ्यांसाठी हेलिकॉप्टरची व्यवस्था कराच’

राज ठाकरेंच्या नावे खंडणी मागणारे पोलिसांच्या ताब्यात!

ठाण्यात ‘ढाण्या वाघा’चे पोस्टर्स; शिवसेनेला आव्हान दिल्याची चर्चा

उद्धव ठाकरे बकरा, शरद पवार कसाई! सदाभाऊंचा सणसणीत टोला

ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, “केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्याशी संवाद साधला. केरळमध्ये अतिवृष्टी आणि भूस्खलनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीसंदर्भात त्यांच्याशी चर्चा केली. जखमी आणि बाधितांना मदत करण्यासाठी प्रशासन घटनास्थळांवर कार्यरत आहे. मी प्रत्येकाच्या सुरक्षिततेसाठी आणि कल्याणासाठी प्रार्थना करतो.”

तर दुसऱ्या ट्विटमध्ये ते म्हणतात, “केरळमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे काही लोकांनी आपला जीव गमावला हे दुःखद आहे. शोकाकुल कुटुंबीयांप्रती शोकभावना”

केरळच्या दक्षिण आणि मध्य भागाला या पावसाचा सर्वाधिक तडाखा बसला आहे. अशा या आपत्तीजन्य परिस्थिती बचावकार्यासाठी एनडीआरएफच्या ११ तुकड्या पाठवण्यात आल्या आहेत. तर वायुसेनेलाही स्टॅन्ड बायवर ठेवण्यात आले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
197,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा