पालिकेकडून अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठीच्या प्रिमॅटिक शिष्यवृत्तीच्या कामकाजासाठी अल्पसंख्यांक अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या होत्या. या नियुक्त्या करण्यामागे काही घटकांचे तुष्टीकरण करण्याचा प्रयत्न केल्यावर भाजप नेते आणि महानगरपालिकेच्या शिक्षण समितीचे सदस्य प्रतीक कर्पे यांनी आवाज उठवताच पालिका प्रशासनाने माघार घेत या नियुक्यामध्ये बदल करून पळ काढण्याचा प्रयत्न केला आहे ,अशी टीका शिक्षण समिती सदस्य प्रतीक कर्पे यांनी केली.
शिक्षण विभागाच्या अखत्यारितील अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी प्रिमॅटिक शिष्यवृत्तीच्या कामकाजाकरिता मार्गदर्शन, आढावा, पाठपुरावा करण्यासाठी नोडल अधिकारी व नियंत्रण अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्या निवडीवरून कर्पे यांनी आक्षेप नोंदविले होते.
१० पैकी ९ नियुक्त नोडल अधिकारी एका विशिष्ट समाजाचे आहेत यावर आक्षेप घेण्यात आला होता. अल्पसंख्याक गटात एकाच समाजाचा समावेश होतो का, असाही सवाल उपस्थित करण्यात आला होता. जे काम मुख्याध्यापक करतात त्यासाठी अधिकारी कशाला हवेत आणि त्यातून नेमके काय साध्य करायचे आहे, असा प्रश्नही कर्पे यांनी उपस्थित केला होता. सत्ताधारी शिवसेना तुष्टीकरणाचा प्रयत्न करत असल्याचा घणाघातही कर्पे यांनी केला होता.
महापालिकेकडून धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न होत असून शिक्षण विभागातील अल्पसंख्यांक अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्याकरिता १५ सप्टेंबर २०२१ रोजी पालिकेकडून नियुक्ती पत्रक जारी करण्यात आले होते. या पत्रकात एका विशिष्ठ समाजाला झुकते माप देण्यात आल्याचे निर्दशनास आल्यावर भाजपाकडून या संदर्भात २८ सप्टेंबर २०२१ रोजी सोशल मिडियाच्या माध्यमातून आवाज उठवताच झोपलेल्याचे सोंग घेणाऱ्यांना जाग आली. त्यानंतर तातडीने महापालिका प्रशासनाने पुन्हा नियुक्तीचे परित्रक जारी करत माघार घेणारी भूमिका घेतली मात्र, हे केवळ सोंग असल्याची टीका प्रतीक कर्पे यांनी केली.
हे ही वाचा:
आर्यन खानने एनसीबी अधिकाऱ्यांना दिलं ‘हे’ वचन
भारतातील बैठकीसाठी पाकिस्तानलाही दिले निमंत्रण
‘काँग्रेस पक्षाची अवस्था ही सर्कससारखी झाली आहे’
टी-२० क्रिकेटचा विश्वविजेता होण्यासाठी आजपासून घमासान
कर्पे यांनी घेतलेल्या या रोखठोक भूमिकेमुळे ठराविक समाजातील लोकांची जी नियुक्ती केली होती, त्यात नंतर बदल करण्यात आला आहे. गोरखनाथ भवारी, आशा प्रदीप मोरे, विश्वास रोकडे, अमोल भगत, अशोक खरे आदिंचा समावेश या यादीत करण्यात आला.