ब्रिटीश कायदेतज्ज्ञ डेव्हिड अमेस यांच्यावर १७ वेळा चाकूने वार करण्यात आले. या हल्ल्यात अमेस यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात चार मुली, एक मुलगा आणि पत्नी आहे. ब्रिटीश खासदार डेव्हिड अमेस यांच्या हत्येमागे इस्लामवादी अतिरेकी कारणीभूत असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. ६९ वर्षीय अमेस कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे होते आणि ते १९९७ पासून साउथ एंड पश्चिम मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत होते.
शुक्रवारी (१५ ऑक्टोबर) ते आपल्या मतदारसंघासाठीच्या कार्यक्रमामध्ये असताना एका २५ वर्षीय व्यक्तीने इमारतीत प्रवेश केला आणि त्यांच्यावर चाकूने अनेक वार केले. त्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली. या घटनेला अधिकृतपणे दहशतवादाचे कृत्य म्हणून घोषित करण्यात आले असून जे हत्येमागे इस्लामवादी प्रेरणांची पुष्टी करते.
हे ही वाचा:
ब्रिटिश खासदाराची चाकूने भोसकून हत्या
वाझे तुरुंगात जाऊनही ठाकरे सरकारमध्ये महावसूली सुरूच
लखबीर सिंगच्या निर्घृण हत्येप्रकरणी निहंग शीख ताब्यात
महाविकास आघाडी पुन्हा बंदची हाक देणार का?
गेल्या पाच वर्षांत खून झालेल्या सदस्यांपैकी डेव्हिड अमेस हे संसदेचे दुसरे सदस्य आहेत. लेबर पार्टीशी संबंधित एका खासदाराला २०१६ मध्ये अशाच एका मतदारसंघाच्या बैठकीदरम्यान अतिरेक्याने ठार केले होते. २०१० मध्येही स्टीफन टिम्स नावाच्या एका लेबर खासदारावर चाकूने वार करण्यात आले होते; पण ते या हल्ल्यातून बचावले होते.