27 C
Mumbai
Tuesday, November 26, 2024
घरक्राईमनामानवाब मलिक आधी पुरावे द्या, मग बोला!

नवाब मलिक आधी पुरावे द्या, मग बोला!

Google News Follow

Related

फ्लेचर पटेल, यासमिन वानखेडे यांनी दिले प्रत्युत्तर

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी एनसीबीविरोधा पत्रकार परिषद घेतल्यावर त्यांना रोखठोक उत्तर देण्यासाठी फ्लेचर पटेल आणि समीर वानखेडे यांच्या भगिनी यासमिन वानखेडे यांनी पत्रकारांना माहिती दिली.

फ्लेचर पटेल म्हणाले की, २६ तारखेला आम्ही कार्यक्रम घेतला होता तेव्हा समीर वानखेडे यांना आम्ही बोलवलं होते आणि त्यांच्यासोबत काम करण्याचे आश्वासन दिले होते. येणाऱ्या पिढीला आणि महाराष्ट्राला अमलीपदार्थमुक्त करू, अशी घोषणा आम्ही केली होती. त्यांना जेव्हा गरज लागते तेव्हा आम्ही त्यांच्या सोबत असतो.

फ्लेचर पुढे म्हणाले की, नवाब मलिक अशा गोष्टी कशा काय जाहीर करतात. पंचांची ओळख त्यांनी जाहीर केली आहे. त्यामुळे आमच्या जीविताला आता धोका आहे. खरे तर नवाब मलिक हेच बनावट (फर्जीवाडा) आहेत. नवाब मलिक यांना कशी माहिती मिळते एनसीबीसंदर्भात? तुमचे अधिकारी आहेत का तिकडे? चांगल्या परिवारावर तुम्ही गालबोट लावत आहात. नवाब मलिक यांची ही पब्लिसिटी निगेटिव्ह आहे. नवाब मलिक यांना विनंती की, तुम्ही एनसीबी बरोबर बोला आणि अशी माहिती कृपया जगजाहीर करू नका. खरे तर, नवाब मलिक यांना मी ओळखत नाही. त्यामुळे नवाब मलिक यांनी मला का प्रश्न विचारावा?

 

हे ही वाचा:

ब्रिटिश खासदाराची चाकूने भोसकून हत्या

मुख्यमंत्र्यांच्या मेव्हण्यांकडे येणार का सरकारी पाहुणे?

रेल्वे प्रवासासाठी तिकीट नाहीच, पासच घ्यावा लागणार!

ईडी, एनसीबी, सीबीआयविरोधाचा राग पुन्हा पवारांनी आळवला

 

समीर वानखेडे यांच्या भगिनी यासमिन वानखेडे म्हणाल्या की, कॅबिनेट मंत्री अशी कोणताही आधार नसलेली वक्तव्ये कशी काय करतात? अशी वक्तव्ये करण्यापूर्वी त्यांनी त्यांनी विचार करावा. माझा भाऊ योग्य कारवाईच करत आहे. मी मनसे चित्रपट सेनेत उपाध्यक्ष आहे.कायदेशीर कामे पाहते. माझी जी राजकीय पत आहे, माझ्या कामाचा त्यांनी आदर करायला हवा. ते उलट चुकीची प्रेरणा समाजाला देत आहेत. त्यांना हे समजायला हवे. जर त्यांच्याकडे खरोखरच पुरावे असतील तर ते त्यांनी द्यावेत. मग बोलावे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
198,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा