राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि महाराष्ट्राचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी गेल्या काही दिवसांपासून नार्कोटिक्स कन्ट्रोल ब्युरो अर्थात एनसीबी विरोधात पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेतली आहे. एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी कारवाई दरम्यान पंच म्हणून एका कौटुंबिक मित्राला नेले होते असा एक नवा आरोप मलिक यांनी केला आहे. शनिवार, १६ ऑक्टोबर रोजी पत्रकार परिषद घेत नवाब मलिकांनी आरोप केले आहेत.
फ्लेचर पटेल कोण? लेडी डॉन कोण?
नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत फ्लेचर पटेल कोण? असा सवाल उपस्थित केला आहे. फ्लेचर पटेल यांनी ज्या महिलेसोबत ‘माय लेडी डॉन’ असे म्हणत फोटो टाकला आहे ती लेडी डॉन नेमकी कोण आहे? असे नवाब मलिक यांनी विचारले आहे. तर एनसीबीच्या वेगवेगळ्या कारवायांमध्ये फ्लेचर पटेल हाच व्यक्ती पंच म्हणून कसा असतो? असेही मलिक यांनी विचारले आहे.
हे ही वाचा:
बालकल्याण मंत्री म्हणतात, महिलांनो झोपायच्या आधी थोडी दारू प्या!
‘उद्धवजींमध्ये राहुलजी स्पष्ट दिसतात’
राहुल द्रविडकडे प्रशिक्षकपदाची जबाबदारी
मुख्यमंत्र्यांनी केवळ गरळ ओकली
फ्लेचर पटेल हे माजी सैन्याधिकारी आहेत. त्यांनी २० वर्ष भारतीय सैन्यात कार्यरत होते. तर सध्या ते खासगी फिटनेस ट्रेनर म्हणून काम करत आहेत. कॉर्डीला क्रूज पार्टी प्रकरणात फ्लेचर पटेल हे पंच होते. तर या आधी रिया चक्रवर्ती प्रकरणातही पटेल यांनी एनसीबीचे पंच म्हणून काम पहिले आहे. त्यावरूनच नवाब मलिक यांनी एनसीबीवर निशाणा साधला आहे.