23 C
Mumbai
Tuesday, November 26, 2024
घरराजकारणजनाब राऊत...तुम्हाला वाघाच्या शेपटीचीही उपमा देता येणार नाही

जनाब राऊत…तुम्हाला वाघाच्या शेपटीचीही उपमा देता येणार नाही

Google News Follow

Related

भारतीय जनता पार्टीचे आक्रमक आमदार गोपीचंद पडळकर यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे नावाचा एकमेव वाघ होऊन गेला. पण तुम्हाला वाघाच्या शेपटीचीही उपमा देता येणार नाही असा घणाघात पडळकर यांनी केला आहे. ट्विटरवर एक व्हिडीओ संदेश पोस्ट करत पडळकरांनी राऊतांवर निशाणा साधला आहे.

काय म्हणाले पडळकर?
“माझा महाराष्ट्र खरोखरच सोन्यासारखा आहे. तुमचे महाविकास आघाडीचे सरकार दगाफटका करून आल्यापासून महाराष्ट्राला लुटण्याची एकही संधी सोडलेली नाही. मागील दोन वर्षांमध्ये कोकणामध्ये दोन वेळा चक्रीवादळ आले. शेतकऱ्यांची पिके कधी दुष्काळाने तर कधी ओल्या दुष्काळाने मातीमोल झाली.

स्वप्निल लोणकर सारख्या होतकरू तरुणाने तुमच्या नाकर्तेपणामुळे आत्महत्या केली. महाराष्ट्रात लालपरीची सेवा देणाऱ्या २८ कर्मचाऱ्यांनी पगार मिळत नाही म्हणून आत्महत्या केली आणि बारा बलुतेदार आणि फाट्यावरती आर्थिक चणचणीमुळे आत्महत्येची वेळ आली आहे. हे सर्व सुरू असताना तुम्ही फक्त कागदी घोडे नाचवत आहात प्रत्यक्षामध्ये मदत काही त्यांना दिलीच नाही.

हे ही वाचा:

‘उद्धवजींमध्ये राहुलजी स्पष्ट दिसतात’

राहुल द्रविडकडे प्रशिक्षकपदाची जबाबदारी

धोनीच्या ३००व्या सामन्यात चेन्नई संघाने लुटले विजेतेपदाचे सोने

यांना हिरक महोत्सव आणि अमृत महोत्सव मधला फरक कळत नाही, हे कसले विचारांचे सोने लुटणार?

सर्वसामान्यांचा विषय आला तर तुमच्या आघाडीमध्ये बिघाडी होते. परंतु बदल्यांचा मलिदा खाण्यासाठी तुमच्यामध्ये एकवाक्यता होते. म्हणून तर तुम्हाला दिवाळी दसरा रोजच आहे. मेंढ्या हे शेतकऱ्यासाठी उपजीविकेचे साधन त्या दूधही देतात आणि उबही देतात. महावसुली वाल्यांना हे कळणार नाही. या महाराष्ट्रामध्ये एकमेव वाघ गेले ते म्हणजे हिंदूंचे हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे. तुम्हाला वाघाच्या शेपटीची उपमाही देता येणार नाही.”

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
198,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा