टी- २० वर्ल्डकपनंतर सध्याचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा कालावधी संपणार आहे. आयसीसी टी- २० वर्ल्डकपनंतर न्यूझीलंडचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघासोबत ‘द वॉल’ अशी ओळख असणारे राहुल द्रविड हे प्रशिक्षकाच्या भूमिकेत असतील, अशी माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळातील (बीसीसीआय) अधिकाऱ्यांनी दिली आहे.
राहुल द्रविड हे कमीत कमी न्यूझीलंड दौऱ्यात संघाचे प्रशिक्षक असतील. यासंदर्भात बीसीसीआयने त्यांच्याशी संपर्क केला आहे. जोपर्यंत दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यासाठी प्रशिक्षकाचा शोध घेत नाही तोपर्यंत त्यांच्यावर ही जबाबदारी असेल. ‘इनसाइडस्पोर्ट’ने दिलेल्या वृत्तानुसार बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
हे ही वाचा:
‘उद्धवजींमध्ये राहुलजी स्पष्ट दिसतात’
दैनिक जागरण समूहाचे योगेंद्र गुप्ता कालवश
धोनीच्या ३००व्या सामन्यात चेन्नई संघाने लुटले विजेतेपदाचे सोने
यांना हिरक महोत्सव आणि अमृत महोत्सव मधला फरक कळत नाही, हे कसले विचारांचे सोने लुटणार?
न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी राहुल द्रविड हे प्रशिक्षक असतील. दरम्यानच्या काळात नव्या प्रशिक्षकाचा शोध घेण्यात येईल. याबाबत राहुल द्रविड यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केलेली नाही. पण आमची आशा आहे की त्यांनी फार घाई करू नये, असे संबंधित अधिकाऱ्याने सांगितले. त्यानंतरही नवा प्रशिक्षक न मिळाल्यास राहुल द्रविड यांना पदावर आणखी काही काळ राहण्याची विनंती करण्यात येईल. नुकतेच राहुल द्रविड यांनी श्रीलंका दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाचे प्रशिक्षक पद सांभाळले होते. तेव्हाच भारताचा एक संघ इंग्लंड दौऱ्यावर होता आणि दुसरा संघ श्रीलंका दौऱ्यावर होता.
टी- २० वर्ल्डकपनंतर शास्त्रींसोबत गोलंदाजीचे प्रशिक्षक भरत अरुण आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर श्रीधर यांचाही कार्यकाळ संपणार असून रवी शास्त्री २०१७ पासून भारतीय संघाचे प्रशिक्षक आहेत. २०१९ मध्ये त्यांना मुदत वाढ मिळाली होती.