शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल (१५ ऑक्टोबर) दसरा मेळाव्यामध्ये भाषण केले. त्यादरम्यान ठाकरे यांनी मेळाव्याच्या भाषणात राणे कुटुंबीयांवर अप्रत्यक्षपणे टीका केली होती. त्यावर भाजप आमदार नितेश राणे यांनीही ट्विट करत टीकेची तोफ डागली.
‘दसरा मेळाव्याच्या भाषणानंतर मला उद्धवजींमध्ये राहुलजी एकदम स्पष्ट दिसत आहे, हे मी अगदीच आत्मविश्वासाने सांगतो. यात कोणतीही शंका नाही,’ असे ट्विट नितेश राणे यांनी करत टीकास्त्र सोडले. यावर आता शिवसेनेकडून काय प्रतिक्रिया येणार याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
After Dussehra speech..
With full confidence I can say..
Humko uddhavji mein Rahulji ekdum clear dekte hain!!!
Koi doubt nahi!!
— nitesh rane (@NiteshNRane) October 15, 2021
उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्याच्या भाषणात राणे कुटुंबीयांवर अप्रत्यक्षपणे टीका केली होती. उद्धव ठाकरे आणि राणे कुटूंबीय यांच्यात गेली काही वर्षे संघर्ष सुरू आहे. देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवावरून राणे यांनी उद्धव ठाकरे यांना डिवचले होते. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. चिपी विमानतळ उदघाटनात त्याचे प्रतिबिंब उमटले.
हे ही वाचा:
दैनिक जागरण समूहाचे योगेंद्र गुप्ता कालवश
धोनीच्या ३००व्या सामन्यात चेन्नई संघाने लुटले विजेतेपदाचे सोने
यांना हिरक महोत्सव आणि अमृत महोत्सव मधला फरक कळत नाही, हे कसले विचारांचे सोने लुटणार?
आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंकडे केली ही ‘अजब’ विनंती
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा दसरा मेळावा शिवाजी पार्क येथे आयोजित न करता मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात आयोजित करण्यात आला होता. सामान्य शिवसैनिकांना मेळाव्याला उपस्थित राहण्याची परवानगी नव्हती. फेसबुक आणि इतर समाज माध्यमांमधून शिवसैनिक दसरा पाहता यावा याची सुविधा करण्यात आली होती.