दैनिक जागरण समूहाचे अध्यक्ष योगेंद्र मोहन गुप्ता यांचे निधन झाले आहे. शुक्रवार १५ ऑक्टोबर रोजी कानपूर येथे त्यांचे निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून कानपूर मधील एका स्थानिक रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. पण विजयादशमीच्या दिवशी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. गुप्ता यांच्या जाण्याने पत्रकारिता तसेच जाहिरात आणि कला जगताचे मोठे नुकसान झाल्याचे म्हटले जात आहे.
शनिवार १६ ऑक्टोबर रोजी गुप्ता यांच्यावर गंगाकिनारी अंतिम संस्कार केले जाणार आहेत. तर रविवारी दुपारी शांतीपाठ आणि हवन आयोजित करण्यात आला आहे. योगेंद्र मोहन गुप्ता हे आपल्या तरुणपणापासूनच दैनिक जागरण समुहाच्या कामकाजाशी जोडले गेले होते. त्यांनी जाहिरात क्षेत्राचा कारभार सांभाळायला सुरुवात केली होती. जागरण समूहाला आर्थिकदृष्ट्या बळकटी देण्यात योगेंद्र मोहन गुप्ता यांची भूमिका महत्त्वाची मानली जाते.
हे ही वाचा:
धोनीच्या ३००व्या सामन्यात चेन्नई संघाने लुटले विजेतेपदाचे सोने
यांना हिरक महोत्सव आणि अमृत महोत्सव मधला फरक कळत नाही, हे कसले विचारांचे सोने लुटणार?
आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंकडे केली ही ‘अजब’ विनंती
आर्यन खानला शाहरुखने पाठवली मनीऑर्डर
योगेंद्र गुप्ता यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. आपल्या ट्विटमध्ये ते म्हणतात. “दैनिक जागरण समूहाचे अध्यक्ष योगेंद्र मोहन गुप्ता यांच्या निधनामुळे अत्यंत दु: ख झाले आहे. त्यांच्या जाण्याने कला, साहित्य आणि पत्रकारिता जगताची कधीही भरून न येणारी हानी झाली आहे. या दुःखद प्रसंगी मी त्यांच्या कुटुंबीयांप्रति सहवेदना व्यक्त करतो. ओम शांती!”
दैनिक जागरण समूह के चेयरमैन योगेन्द्र मोहन गुप्ता जी के निधन से अत्यंत दुख हुआ है। उनका जाना कला, साहित्य और पत्रकारिता जगत के लिए एक अपूरणीय क्षति है। शोक की इस घड़ी में उनके परिजनों के प्रति मैं अपनी संवेदनाएं व्यक्त करता हूं। ऊं शांति!
— Narendra Modi (@narendramodi) October 15, 2021