25 C
Mumbai
Tuesday, November 26, 2024
घरदेश दुनियाधोनीच्या ३००व्या सामन्यात चेन्नई संघाने लुटले विजेतेपदाचे सोने

धोनीच्या ३००व्या सामन्यात चेन्नई संघाने लुटले विजेतेपदाचे सोने

Google News Follow

Related

कोलकाता नाइट रायडर्सवर मिळविला मोठा विजय

चेन्नई सुपर किंग्जने २०२१च्या आयपीएल हंगामाचे विजेतेपद दिमाखात पटकाविले. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्ज संघाने मिळविलेले हे चौथे आयपीएल विजेतेपद ठरले. चेन्नई सुपर किंग्जने केलेल्या ३ बाद १९२ धावांना उत्तर देताना प्रतिस्पर्धी कोलकाता नाइट रायडर्सला ९ बाद १६५ धावा करता आल्या. त्यामुळे चेन्नईने २७ धावांनी हा दणदणीत विजय साकारला. विशेष म्हणजे टी-२० क्रिकेट प्रकारात प्रथमच एका खेळाडूने ३०० सामन्यात आपल्या संघाचे नेतृत्व केले. तो मान मिळाला महेंद्रसिंग धोनीला. हा अंतिम सामना त्याच्या कारकीर्दीतला ३००वा टी-२० सामना होता. चेन्नईचा कर्णधार म्हणून त्याने २१४ सामन्यांत नेतृत्व केले तर पुणे सुपरजायन्टस संघाच्या १४ सामन्यांत तो कर्णधार होता तसेच भारताच्या ७२ टी-२० सामन्यांत तो कर्णधार राहिला आहे. या ३०० व्या सामन्यात त्याला आयपीएल विजेतेपदाची गोड भेट मिळाली.

चेन्नई सुपर किंग्जचा तडाखेबंद खेळाडू ऋतुराद गायकवाडला ऑरेंज कॅप देऊन गौरविण्यात आले. त्याने फलंदाज म्हणून या हंगामात सर्वोत्तम कामगिरी केली. या सन्मानासोबत विजेतेपदाची ट्रॉफी मिळाल्यामुळे आपला आनंद गगनात मावेनासा झाला आहे, असे तो म्हणाला. महाराष्ट्राच्या दोन खेळाडूंना यानिमित्ताने विजेत्या संघात चमकदार कामगिरी करता आली. ऋतुराजबरोबरच शार्दुल ठाकूरने अंतिम सामन्यात ३ बळी मिळवत विजेतेपदात सिंहाचा वाटा उचलला.

प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने अवघे ३ फलंदाज गमावून १९२ धावा केल्या होत्या. त्यात फाफ डु प्लेसिसच्या ८६ धावा आणि ऋतुराजच्या ३२ धावांचा समावेश होता. उथप्पानेही ३२ धावांची खेळी केली. त्याला उत्तर देताना कोलकाताने छान सुरुवात केली. शुभमन गिल (५१) आणि वेंकटेश अय्यर (५०) यांनी पहिल्या विकेटसाठी ९१ धावांची भागीदारी केली पण नंतर शिवम मावी (२०) आणि लॉकी फर्ग्युसन (१८) यांचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या करता आली नाही. त्यामुळे चेन्नईने हा सहज विजय मिळविला. शार्दुलने ३८ धावांत ३ तर रवींद्र जाडेजाने ३७ धावांत २ आणि जोश हेझलवूडने २९ धावांत २ बळी घेतले.

हे ही वाचा:

यांना हिरक महोत्सव आणि अमृत महोत्सव मधला फरक कळत नाही, हे कसले विचारांचे सोने लुटणार?

आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंकडे केली ही ‘अजब’ विनंती

शिवसेनेनं उप-यांच्या मदतीनंच हे महाविकास आघाडी सरकार स्थापन केलंय

उद्धव ठाकरे पुन्हा बसले हिंदुत्वाच्या लाटेवर

स्कोअरबोर्ड

चेन्नई सुपर किंग्ज ३ बाद १९२ (फाफ डू प्लेसिस ८६, ऋतुराज गायकवाड ३२, रॉबिन उथप्पा ३१) विजयी वि. कोलकाता नाइट रायडर्स ९ बाद १६५ (शुभमन गिल ५१, वेंकटेश अय्यर ५०, शिवम मावी २०, शार्दुल ३८-३, जोश हेझलवूड २९-२, जाडेजा ३७-२)

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
198,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा