नवाब मलिकांना अनेक गोष्टींचे अगाध ज्ञान आहे. आता त्यांच्या अध्यक्षतेखाली कमिशन नेमायला हवं. सर्व गोष्टी माहीत असल्याप्रमाणे मलिक निवाडा देतात, असा घणाघात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला. नवाब मलिक यांनी माध्यमांशी बोलताना त्यांच्या जावयाला कसे अमली पदार्थ प्रकरणात फसवण्यात आले यावर भाष्य केले होते. त्याचवेळी त्यांनी जावयाकडे हर्बल तंबाखू होता, गांजा नव्हता असे स्पष्टीकरणही दिले. त्याचा प्रवीण दरेकर यांनी चांगलाच समाचार घेतला.
यावर अधिक बोलताना दरेकर म्हणाले, एनसीबीपेक्षा अधिक माहिती मलिकांना आहे. त्यामुळेच ते अंतिम निर्णय देऊन मोकळे होतात. तो गांजा होता का तंबाखू होता याचं नवाब मलिकांना अगाध ज्ञान जास्त दिसतंय, अशीही टीका दरेकरांनी केली. तसेच अधिक यावर बोलताना ते म्हणाले, मलिकांची पारख खूपच चांगली आहे. खरंतर त्यांना अधिकार देत, एनसीबीने त्यांना मार्गदर्शक म्हणून घ्यायला हवं. आपल्या जावयाला आठ महिने अटक केली ती खरी मळमळ आहे, असेही मत दरेकरांनी यावेळी व्यक्त केले.
हे ही वाचा:
अनंत करमुसे प्रकरणात जितेंद्र आव्हाडांना अटक! पण तात्काळ जामीन
बांगलादेशमध्ये दुर्गापूजेविरोधात हिंदूंवर इस्लामिक हल्ले
अमित शाह म्हणाले पुन्हा सर्जिकल स्ट्राईक करू
मोदीजी, बांगलादेशी हिंदूंना मदत करा!
माध्यमांशी बोलताना नवाब मलिक म्हणाले होते की, एनसीबीने २०० किलो गांजा तंबाखू असल्याचे सांगितले. ते म्हणाले की सर्वात मोठा प्रश्न असा आहे की इतकी मोठी एजन्सी तंबाखू आणि गांजामध्ये फरक करू शकत नाही. मलिक म्हणाले की, माझ्या माहितीनुसार, या एजन्सीजकडे इन्स्टंट टेस्टिंग किट आहे ज्यातून हे कळते की पुनर्प्राप्त केलेली वस्तू एनडीपीएस कायद्यांतर्गत समाविष्ट करण्याची गोष्ट आहे की नाही. ते म्हणाले की मला माहित नाही की एनसीबी कसे काम करत आहे. त्यामुळेच आता चांगलाच गदारोळ उडालेला आहे. मलिकांच्या या वक्तव्यावर समीर वानखेडे म्हणाले, प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे त्यावर बोलणे योग्य नाही.