बुधवारी दक्षिण -पूर्व नॉर्वेमध्ये एक अत्यंत विचित्र आणि दुर्दैवी प्रकार घडला. एका व्यक्तीने धनुष्य बाणांचा वापर करत पाच जणांचा बळी घेतला. त्याचबरोबर दोन जण गंभीर जखमीही झाल्याची माहिती नॉर्वे पोलिसांनी दिली. या संशयिताला अटक केल्याची माहितीही पोलिसांनी दिली आहे. कोंग्सबर्ग शहराच्या मध्यवर्ती भागात अनेक ठिकाणी झालेल्या हल्ल्याचा हेतू अज्ञात होता परंतु दहशतवाद अद्यापही नाकारता येत नाही असेही पोलिसांनी सांगितले.
पोलीस अधिकारी ओयविंड आस यांनी पाच जण ठार झाल्याची पुष्टी केली आहे. दोन जखमी रुग्णालयात क्रिटिकल केअर युनिटमध्ये होते पण त्यांचा जीव धोक्यात असल्याचे दिसत नाही, असे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. जखमींपैकी एक ऑफ-ड्यूटी पोलीस अधिकारी होता जो एका दुकानात होता, अनेक ठिकाणी हल्ला झाला. “ज्या व्यक्तीने हे कृत्य केले त्याला पोलिसांनी अटक केली आहे आणि आमच्या माहितीनुसार, फक्त एकच व्यक्ती यात सामील आहे,” असं त्यांनी सांगितलं.
“घटना ज्या प्रकारे घडल्या हे पाहता, हा दहशतवादी हल्ला आहे की नाही हे मूल्यांकन करणे आवश्यक आहे.” असंही ते म्हणाले. पोलिसांनी संशयिताची ओळख फक्त ३७ वर्षीय डॅनिश नागरिक एवढीच सांगितली आहे. जो कोंग्सबर्गमध्ये राहतो.
हे ही वाचा:
तालिबानच्या राज्यात चक्क नवरात्रौत्सव
‘किमान रावणाला मदत करणारी ‘शूर्पणखा’ तरी महिला आयोगावर नको!’
ICC T20 WC: भारतीय संघात लॉर्ड ठाकूरचा समावेश
IPL 2021: अंतिम फेरीत चेन्नईला कोलकाता भिडणार
“आम्ही या माहितीची पुष्टी करण्याचा निर्णय घेतला कारण या हल्ल्याच्या गुन्हेगाराबद्दल सोशल नेटवर्कवर अनेक अफवा पसरत होत्या.” असे बुधवारी रात्री जारी केलेल्या पोलीस निवेदनात म्हटले आहे.