माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांना आज संध्याकाळी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मनमोहन सिंग यांना ताप आणि अशक्तपणा जाणवत असल्यामुळे त्यांना दिल्लीच्या अखिल एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या वर्षाच्या सुरुवातीला, माजी पंतप्रधान आणि काँग्रेसचे ८८ वर्षीय नेते मनमोहन सिंग हे कोविड संसर्गाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान कोविड-१९ साठी पॉझिटिव्ह आढळल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
Former Prime Minister Dr. Manmohan Singh admitted to All India Institute of Medical Sciences, Delhi
(file photo) pic.twitter.com/SAm5NOpeiF
— ANI (@ANI) October 13, 2021
एआयसीसीचे संपर्क प्रभारी सचिव प्रणव झा म्हणाले की, डॉ.सिंग यांच्यावर “नियमित उपचार सुरू आहेत आणि त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांनी सिंग यांच्या आरोग्याबाबतच्या “बिनबुडाच्या अफवा” देखील फेटाळल्या आहेत.
सिंह यांना एम्सच्या हृदयरोग विभागात दाखल करण्यात आले आहे. माजी पंतप्रधानांना हृदयाशी संबंधित आजारांचा इतिहास आहे आणि त्यांनी २००९ मध्ये रुग्णालयात बायपास शस्त्रक्रिया केली होती.
हे ही वाचा:
…कर्नाटक काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या भ्रष्टाचाराबद्दल काँग्रेसचेच नेते कुजबुजले
एअर इंडिया नंतर मोदी सरकार ‘या’ कंपनीचे खासगीकरण करणार
राजस्थानमधील काँग्रेसचे मंत्री म्हणाले, महिला कर्मचारी म्हणजे डोकेदुखी!
मोदी सरकारच्या योजना मानवाधिकारांचं जतन करणाऱ्या
१९९० पासून, जेव्हा त्यांनी पहिली बायपास शस्त्रक्रिया केली, तेव्हापासून सिंग यांच्यावर पाच बायपास शस्त्रक्रिया आणि २००४ मध्ये स्टेंटिंग उपचार केले.
गेल्या वर्षी मे महिन्यात त्यांनी छातीत दुखत असल्याची तक्रार केल्यानंतर त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले होते.