या व्हिडिओमध्ये उत्तमराव पाटील यांच्याबद्दल काही किस्से सांगितले आहेत.
उत्तमराव पाटील हे भारतीय जनसंघाचे ज्येष्ठ नेते होते. उत्तर महाराष्ट्रातून येणारे उत्तमराव पाटील हे पुढे जनसंघाचे महाराष्ट्राचे नेते झाले. उत्तमराव खासदार म्हणून दिल्लीलासुद्धा गेले. उत्तमरावांसारख्या धडाडीच्या कार्यकर्त्याला बघून अनेक पक्षांमधले मोठे नेते भारावून गेले होते.
यातलेच एक होते यशवंतराव चव्हाण. यशवंतरावांनी आयुष्यभर बेरजेचं राजकारण केल्यामुळे उत्तमराव काँग्रेस पक्षात यावेत असं त्यांना वाटणं साहजिक होतं. त्याकाळात भारतीय जनसंघ सत्तेपासून फार लांब होता. अशा परिस्थितीत यशवंतराव चव्हाणांनी त्यांचे काही दूत उत्तमरावांकडे पाठवले. त्यांना उत्तमरावांनी सांगितले की मी माझी पक्षनिष्ठा सत्तेसाठी बदलणार नाही.
अशा तत्वनिष्ठ आणि पक्षनिष्ठ कार्यकर्त्याच्या आणि नेत्याच्या खान्देशात आज भाजपाची स्थिती पाहून, कालाय तस्मै नमः असंच म्हणावं लागतं.