28 C
Mumbai
Sunday, November 24, 2024
घरविशेषधोनीला 'मेंटॉर' पदासाठी एकही पैसा नको

धोनीला ‘मेंटॉर’ पदासाठी एकही पैसा नको

Google News Follow

Related

बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी मंगळवारी पीटीआयला सांगितले की, माजी कर्णधार एमएस धोनी या महिन्यात यूएई आणि ओमान येथे होणाऱ्या टी -२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघाचे मार्गदर्शन करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारणार नाही. बीसीसीआयने गेल्या महिन्यात माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी मार्गदर्शक म्हणून आणले होते. बीसीसीआयने १७ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या टी-२० विश्वचषक संघाची घोषणा केली होती.

धोनीने गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्याने २०१९ विश्वचषक उपांत्य फेरीत भारतासाठी शेवटचा सामना खेळला होता.

धोनीला त्याच्याकडच्या रणनीती आखण्याच्या अनुभवासाठी संघात आणले गेले आहे असे मानले जाते. त्याने रविवारी चेन्नई सुपर किंग्जचे नेतृत्व करत आयपीएलच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. यावेळी त्याने पुन्हा एकदा उत्कृष्ट “फिनिशर’ची भूमिका बजावली होती.

भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक, गूढ यष्टीरक्षक-फलंदाजाने भारताला दोन विश्व विजेतेपद मिळवून दिले आहेत. २००७ मध्ये दक्षिण आफ्रिकेतील टी -२० विश्वचषक आणि भारतात २०११ साली खेळला गेलेला एकदिवसीय विश्वचषक यामध्ये धोनीच्या कर्णधार कौशल्यामुळे भारताला विजेतेपद मिळवण्यात मोठा हातभार लावला होता.

हे ही वाचा:

दोन ते अठरा वर्षे वयोगटातील मुलांनाही आता मिळणार कोवॅक्सिन

पाकिस्तानी दहशतवाद्याला केली दिल्लीत अटक

जळगावात फुकटसेनेच्या ‘रणरागिणींचा’ भलताच प्रताप

वाहतूक नियम मोडणाऱ्यांना लावणार जबरदस्त ‘ब्रेक’

गेल्या वर्षी १५ ऑगस्ट रोजी एका इंस्टाग्राम पोस्टद्वारे त्याने जाहीर केलेल्या निवृत्तीने क्रिकेट जगताला आश्चर्याचा धक्का दिला होता. त्यानंतर तो याबद्दल एकदाही बोललेला नाही.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
196,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा