28 C
Mumbai
Sunday, November 24, 2024
घरराजकारण'महापालिकेत शिवसेनेकडून होतेय मराठीची गळचेपी'

‘महापालिकेत शिवसेनेकडून होतेय मराठीची गळचेपी’

Google News Follow

Related

सत्ताधाऱ्यांकडून पालिका शाळांचे इंग्रजी नामांतर ‘मुंबई पब्लिक स्कूल’ असे करण्यात येणार असून त्याकरिता पालिकेच्या सर्व शाळांसमोर तब्बल १२ कोटी रुपये खर्चून प्रवेशद्वार उभारण्याच्या निर्णयावर भारतीय जनता पक्षाने सडकून टीका केली आहे.

गेल्या दहा वर्षांत मराठी शाळेतील पटसंख्या ७० टक्क्यांनी घटली असून एकेकाळी मराठी नामफलकासाठी लढणाऱ्या बाळासाहेबांच्या शिवसेनेने मराठी शाळा बंद करण्याचा चंगच बांधला असल्याची टीका भारतीय जनता पक्षाचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केली आहे. आपल्याच भूमीत मातृभाषेची गळचेपी भारतीय जनता पक्ष कदापि सहन करणार नाही, असा तीव्र इशारा गटनेते शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिला.

 

हे ही वाचा:

सोन्याचा चमचा घेऊन जन्मलेल्यांनी अंदमानच्या काळकोठडीत एकदा राहून दाखवावं

‘उद्धवजी, किमान राज्यातील जनतेची दिवाळी तरी गोड करा’

बदला घेतला; भारतीय सेनेने तीन दहशतवाद्यांना घातले कंठस्नान

लग्नाच्या मंगल कार्यालयात सुरू होते हे ‘अमंगल’ कार्य!

 

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे मातृभाषेतील शिक्षणास प्राधान्य देते. अशावेळी मुंबई महापालिकेतील मराठी शाळांमधील विद्यार्थी संख्या गेल्या दहा वर्षात १,०२,२१४ वरून ३३,११४ एवढी घसरलेली आहे. मागील १० वर्षात मराठी माध्यमाच्या ४१३ शाळांपैकी फक्त २८० शाळा सुरु आहेत.

मुंबई महापालिकेत सलग २५ वर्षे शिवसेनेची सत्ता असताना देखील मराठी भाषेची ही दुरावस्था झाली आहे. आता तर शिवसेनेच्या युवा नेतृत्वाने मराठी शाळा बंद करण्याचा चंगच  बांधला आहे की काय अशी शंका गटनेते प्रभाकर शिंदे व्यक्त केली.

पालिकेच्या मराठी शाळा एक एक करत बंद करून इंग्रजी शाळा आणि आता सी.बी.एस.सी., आय.सी.एस.सी. शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. सत्ताधाऱ्यांकडून पालिका शाळांच्या इंग्रजी नामकरणासाठी व इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्यांसाठी पायघड्या घालण्याचा प्रकार म्हणजे मायबोली मराठीचा अवमान आहे. मराठी प्रेमाचा कळवळा असणारी शिवसेना दुसरीकडे छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपूल नामकरणाचा प्रस्ताव चार महिने रखडवते. शिवसेनेची भूमिका उद्वेगजनक व निषेधार्ह असून सध्याची वस्तुस्थिती पाहता ही बाळासाहेबांची शिवसेना राहिली नसल्याची जळजळीत टीका भाजपा गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
196,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा