“मानवाधिकारांसाठी ‘निवडक’ दृष्टिकोन देशाची प्रतिमा डागाळतो.” असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना लगावला. मानवाधिकारांची पुंगी राजकीय पोळी भाजण्यासाठी वापरणाऱ्या ‘काही’ राजकीय नेत्यांवर मोदींनी टीका केली. अशा नेत्यांच्या राजकारणामुळेच मानवाधिकार आणि लोकशाही या मुल्ल्यांचे नुकसान झाले आहे.
“काही लोक काही घटनांमध्ये मानवी हक्कांचे उल्लंघन पाहतात पण इतर घटनांमध्ये नाही. राजकीय चष्म्यातून पाहिल्यावर मानवाधिकारांचे उल्लंघन होते. असे निवडक वर्तन लोकशाहीसाठी हानिकारक आहे.” असं मोदी म्हणाले.
“काही जण मानवाधिकारांच्या नावाखाली देशाची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न करतात. राजकीय लाभ आणि नुकसानावर नजर ठेऊन मानवाधिकारांकडे पाहणे हे मानवाधिकार तसेच लोकशाहीला हानी पोहोचवते.” असं मोदी पुढे म्हणाले.
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या २८ व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना पंतप्रधानांनी सरकारच्या ‘सबका साथ, सबका विकास’ मोहिमेचे कौतुक केले आणि ‘सर्वांसाठी मानवी हक्कांचे मूलभूत तत्त्व अधोरेखित केले.’ तसेच या कार्यक्रमाला गृहमंत्री अमित शहासुद्धा उपस्थित होते, ज्यांच्यावर राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे प्रमुख अरुण मिश्रा यांनी जम्मू -काश्मीरमध्ये नवीन युग सुरू केल्याबद्दल कौतुकाचा वर्षाव केला.
हे ही वाचा:
पाकिस्तानी दहशतवाद्याला केली दिल्लीत अटक
जळगावात फुकटसेनेच्या ‘रणरागिणींचा’ भलताच प्रताप
वाहतूक नियम मोडणाऱ्यांना लावणार जबरदस्त ‘ब्रेक’
एनसीबी संचालक वानखेडे यांच्या मागावर गुप्तहेर
मिश्रा यांनी असाही दावा केला की, “आंतरराष्ट्रीय शक्तींच्या आदेशानुसार भारतावर मानवाधिकार उल्लंघनाचा आरोप करणे आता एक आदर्श बनला आहे.” संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार प्रमुखांच्या ‘काश्मीरमधील प्रतिबंधात्मक उपायांमुळे मानवी हक्कांचे उल्लंघन होऊ शकते’ या टीकेचा संदर्भ देत मिश्रा यांनी संयुक्त राष्ट्र मानवाधिकार समितीवरही टीका केली.