लडाखमधील संघर्षावरून भारत आणि चीनच्या लष्करी कमांडर्समधील चर्चेची ताजी फेरी रविवारी पार पडली. ही चर्चेची १३ वी फेरी होती.
परंतु ही चर्चा यशस्वी होऊ शकली नाही. भारतीय लष्कराने म्हटले आहे की, चीनची बाजू मान्य होण्यासारखी नाही. त्यामुळे “कोणतेही दूरगामी प्रस्तावावर चर्चा होऊ शकली नाही.”
“बैठकीदरम्यान, भारताच्या बाजूने उर्वरित क्षेत्रांचे निराकरण करण्यासाठी विधायक सूचना केल्या, परंतु चीन त्या बाबींवर सहमत नव्हता. तसेच कोणतेही दूरगामी प्रस्ताव यावेळी चर्चेदरम्यान उपस्थित झाले नाहीत. त्यामुळे या बैठकीमुळे उर्वरित समस्यांचे निराकरण झाले नाही.” असे लष्कराच्या निवेदनात म्हटले आहे.
“दोन्ही देशांनी चर्चा सुरु ठेवण्यासाठी आणि जमिनीवर स्थिरता राखण्यासाठी सहमती दर्शविली आहे. आमची अपेक्षा आहे की चिनी पक्ष द्विपक्षीय संबंधांचा एकूण दृष्टीकोन विचारात घेईल आणि द्विपक्षीय करार आणि प्रोटोकॉलचे पूर्ण पालन करताना उर्वरित समस्यांचे लवकर निराकरण करण्यासाठी कार्य करेल.” असं ते पुढे म्हणाले.
“सीमा परिस्थिती सुलभ आणि शांत करण्यासाठी जबरदस्त प्रयत्न केले आहेत, आपला प्रामाणिकपणा पूर्णपणे प्रदर्शित केला आहे.” असे सांगत चीनने अपप्रचार केला आहे.
हे ही वाचा:
काश्मीरच्या पुंछमध्ये ५ जवान हुतात्मा
‘बंद आणि विरोध यांचा “धंदा”, गोळा होतो त्यावरच “चंदा”!’
नवाब मलिकविरोधात १०० कोटींचा दावा करणार मोहित कंबोज
चेन्नई सुपर किंग्स पुन्हा एकदा अंतिम फेरीत
रविवारी सुमारे साडेआठ तास चाललेल्या चीनबरोबरच्या लष्करी चर्चेच्या १३ व्या फेरीत भारताने पूर्व लडाखमधील उर्वरित संघर्षाच्या जागांवर लष्कर लवकर सोडण्याची मागणी केली होती.
पूर्व लडाखमधील चुशुल-मोल्दो सीमा बिंदूच्या चीनच्या बाजूने कोर कमांडर-स्तरीय चर्चेचा मुख्य फोकस पेट्रोलिंग पॉईंट १५ (पीपी -१५) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हॉट स्प्रिंग्ज भागात थांबलेले लष्कराची माघार प्रक्रिया पूर्ण करणे होता.