30 C
Mumbai
Sunday, November 24, 2024
घरक्राईमनामातब्बल २१ वर्षांनंतर तरी ती 'जखम' भरून निघेल?

तब्बल २१ वर्षांनंतर तरी ती ‘जखम’ भरून निघेल?

Google News Follow

Related

घाटकोपरमध्ये २१ वर्षांपूर्वी घडलेल्या एका घटनेमध्ये ट्रकमधून सळ्या उतरवताना, एका व्यक्तीला गंभीर जखम झाली. घटना घडून एक दोन नव्हे, तर तब्बल २१ वर्षांनंतर आता न्याय मिळणार अशी चिन्हे दिसू लागली आहेत. मुंबईतील मोटार अपघातामधील दावे लवादाने १५ फेब्रुवारी २०१० रोजी दिलेल्या, आदेशाविरोधात युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीने केलेले अपिल मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळले. त्यामुळे आता युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीला भरपाईची रक्कम द्यावी लागणार आहे. असे आदेशच आता उच्च न्यायालयाने लवादाला दिले आहेत.

लक्ष्मण शेवाळे हे घाटकोपरमधील एका दुकानात काम करत होते. २००२ मध्ये ते फुटपाथवरून जात होते. एका ट्रकमधून आणलेल्या लोखंडी सळ्यांपैकी एक सळी त्यांच्या डोक्यावर पडली. ही सळई डोक्यावर पडून ते गंभीर जखमी झाले. तसेच त्याना कायमचे अपंगत्व आले. या अपघातामध्ये त्यांची दृष्टी अधू झाली होती. तसेच त्यावेळी त्यांना उपचारांसाठी दहा हजार रुपये खर्च आला होता. त्यांनी या अपघातासाठी लवादासमोर अर्ज केला होता. त्यावेळी त्यांनी दीड लाखांची नुकसानभरपाईची मागणी केली होती.

 

हे ही वाचा:

बेस्ट भाडेवाढ टळली; पण तोटावाढ सुरूच!

‘मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय कार्यकारिणीचा कार्यकाळ ३ ऐवजी ५ वर्षे कसा काय झाला?

कोळीवाडे, गावठाण, जीर्ण इमारतींच्या विकासाला हिरवा कंदिल

नवाब मलिकविरोधात १०० कोटींचा दावा करणार मोहित कंबोज

 

या त्यांच्या मागणीला विमा कंपनीने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. न्या. सी. व्ही. भडंग यांनी यावर नुकताच निर्णय जाहीर केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने वाहनाचा वापर ही अभिव्यक्ती असे गृहित धरले आहे. त्यामुळेच भरपाईची तरतूद लागू शकते असे न्यायालयाने म्हटले आहे. तसेच या प्रकरणात सदर वाहन हे एकाच जागी उभे होते. परंतु यातून लोखंडी सळ्या उतरवल्या जात होत्या. शेवाळे यांच्या डोक्यावर सळई पडल्यामुळे त्यांना अपंगत्व आलेले आहे. त्यामुळेच अर्जदार भरपाईसाठी पात्र ठरतात असे न्यायधीशांनी निर्णयामध्ये स्पष्ट केले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
196,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा