28 C
Mumbai
Sunday, November 24, 2024
घरअर्थजगतरतन टाटांनी केले मोदी सरकारच्या धोरणांचे कौतुक

रतन टाटांनी केले मोदी सरकारच्या धोरणांचे कौतुक

Google News Follow

Related

डबघाईस आलेल्या एअर इंडियाला आपल्या पंखाखाली घेण्यासाठी टाटाने टाकलेले पाऊल यशस्वी ठरले आणि त्यांनी एअर इंडियासाठी लावलेली बोली वरचढ ठरली. याचा सर्वाधिक आनंद रतन टाटा यांना झाला.

रतन टाटा यांनी आपला हा आनंद पत्राच्या स्वरूपात व्यक्त केला असून त्यांनी एअर इंडियाच्या ‘पुनरागमना’चे स्वागत केले आहे. शिवाय आपल्या पत्रात त्यांनी मोदी सरकारच्या धोरणांचेही कौतुक केले आहे. ठराविक उद्योग हे खासगीकरणासाठी खुले केल्याबद्दल रतन टाटा यांनी मोदी सरकारचे आभार मानले आहेत.

ते आपल्या पत्रात लिहितात की, टाटा उद्योगसमुहाने एअर इंडियासाठी लावलेली बोली वरचढ ठरली ही अत्यंत आनंदाची घटना आहे. अर्थात, एअर इंडियाला पुन्हा उभारण्याचे मोठे आव्हान टाटा उद्योगसमुहापुढे असेल. पण हवाई उड्डाण उद्योग क्षेत्रात टाटाला स्वतःचे स्थान निर्माण करण्याची एक सुसंधीही चालून आली आहे.

टाटा उद्योगसमुहाने जे.आर.डी. टाटा यांच्या नेतृत्वाखाली एअर इंडियाने एक प्रतिष्ठा मिळविली होती. तीच प्रतिमा जपण्याचा प्रयत्न आता टाटा उद्योगसमूह करेल. आता जर जे.आर.डी. असते तर त्यांना नक्कीच याचा खूप आनंद झाला असता.

 

हे ही वाचा:

ब्रिटनला शहाणपण आले; कोव्हिशिल्ड विलगीकरणाबद्दल घेतला हा निर्णय…

विद्यार्थ्यांना तिकीट द्या…शेवटी मध्य रेल्वेनेच केली राज्य सरकारला विनंती

आर्यन खानचा जामीन अर्ज फेटाळला; आर्थर रोड तुरुंगात रवानगी

स्कूलबसवर विद्यार्थ्यांना विश्वास नाही!

 

एअर इंडियाचे खासगीकरण करण्याचे यापूर्वीचे दोन प्रयत्न अयशस्वी झाले होते. २००१ साली सिंगापूर एअरलाइन्स लि.ने एअर इंडियातील हिस्सेदारीसाठी बोली लावली होती. त्यावेळी या  बातमीनेच राजकीय गदारोळ माजवला होता. २०१८ साली इंडिगो, भारताची सर्वात मोठी विमान कंपनी, या बोलीतून बाहेर पडली. त्यांच्याकडे एअर इंडियाला संपूर्णपणे खरेदी करण्याएवढा पैसा नसल्याचे त्यांनी सांगितले होते. आता स्पाइसजेटनेही एअर इंडियासाठी बोली लावली होती, पण टाटाने तो मान मिळविला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
196,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा