गेल्या आठवड्यात अरुणाचल प्रदेशच्या तवांग सेक्टरमधील यांग्त्सेजवळ भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये किरकोळ चकमक झाली. स्थानिक कमांडर्समधील चर्चेनंतर प्रस्थापित प्रोटोकॉल आणि यंत्रणेनुसार काही तासांनी परिस्थिती नियंत्रणात आली.
सुमारे १० दिवसांपूर्वी १०० पेक्षा जास्त चिनी सैनिकांनी भारतात घुसखोरी केल्यावर “झटापट” झाली. ज्यामुळे दोन्ही बाजूंनी या भागात बऱ्याच प्रमाणात सैनिकांची तैनाती करण्यात आली आहे.
“हा गोंधळ झाला कारण दोन्ही बाजू प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या (एलएसी) स्वतःच्या समजुतीनुसार गस्त घालत होत्या, ज्याचे सीमांकन केलेले नाही. चीनच्या अतिव्यापी दाव्यांमुळे दोन्ही देशांचे सैनिक समोरासमोर आले. परिस्थिती निवळण्यापूर्वी काही तास दोन्ही देशांमध्ये झपाटप सुरू होती. आमच्या संरक्षण इमारतींचे किंवा बंकरांचे कोणतेही नुकसान झाले नाही.” असे एका सूत्राने सांगितले.
“दोन्ही बाजू एलएसीच्या त्यांच्या दाव्यापर्यंत गस्त घालण्याचे उपक्रम राबवतात. जेव्हा चीनचे सैनिक गस्त घालताना भारतीय सैनिकांना भेटतात, तेव्हा परिस्थिती दोन्ही बाजूंनी मान्य प्रोटोकॉल आणि यंत्रणेनुसार व्यवस्थापित केली जाते.” असे सूत्राने सांगितले.
चीनच्या सैन्याने संपूर्ण सीमा सक्रिय ठेवण्याची योजना आखली आहे, जेणेकरून ते त्यांच्या दाव्यांना बळकट ठेवू शकतील. नंतर या क्षेत्रांवर हक्क सांगणे हे त्यांना सोप्पे होऊ शकते.” असे उत्तर सैन्याचे माजी कमांडर लेफ्टनंट जनरल बीएस जसवाल (निवृत्त) म्हणाले.
हे ही वाचा:
महिलांसाठी हा घेण्यात आला ‘बेस्ट’ निर्णय
महाराष्ट्रात १०५० कोटींचा भ्रष्टाचार
जे जे इन्स्टिट्यूटमधून गायब झाले कॅमेरे, महागड्या लेन्स
गेल्या आठवड्यात लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी सांगितले की, पूर्व लडाखमधील एलएसीवरील तणाव कमी करण्यासाठी चायनीज पीपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए) बरोबर लष्करी चर्चेची पुढील फेरी ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात होऊ शकते.