जागतिक उष्णतेच्या टक्केवारीत भारताने निम्म्याहून अधिक योगदान दिल्याचे एका अभ्यासातून समोर आले आहे. अभ्यासानुसार जागतिक उष्णतेमध्ये आणि आर्दतेमध्ये १९८३ पासून ते २०१६ पर्यंत तब्बल तीन पटींनी वाढ झाली आहे. या जागतिक उष्णतेच्या वाढीत भारताचे ५२ टक्के योगदान असून भारतातील महत्त्वाची चार शहरे पहिल्या दहा शहरांच्या यादीत आहेत. दिल्ली, कोलकाता, मुंबई आणि चेन्नई या चार शहरांचा समावेश यादीत आहे.
शहरी भागतील वाढती लोकसंख्या हे उष्णता वाढीसाठीचे एक महत्त्वाचे कारण आहे आणि दुसरे कारण म्हणजे तापमान वाढ. तापमान वाढ, काँक्रिटीकरण आणि जंगल कमी होणे यामुळे वातावरणातील उष्णता वाढत असते. आशियातील शहरांमधील उष्णता वाढण्याचे मुख्य कारण हे वाढती लोकसंख्य आहे, असे अहवालात म्हटले आहे. भारतातील काही शहरांमध्ये उष्णता वाढीसाठी लोकसंख्या वाढ हे कारण आहे, तर काही शहरांमध्ये तापमानातील वाढ हे मुख्य कारण आहे. दिल्लीमध्ये लोकसंख्या वाढ हे उष्णता वाढीसाठी एक प्रमुख कारण आहे, तर कोलकाता आणि मुंबईमध्ये तापमानातील वाढ हे मुख्य उष्णता वाढीसाठीचे कारण आहे.
हे ही वाचा:
रस्त्याच्या कामांसाठीची महापालिकेच्या फेरनिविदा
महिलेची छेड काढणाऱ्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या अधीक्षकाला अटक
… म्हणून ९०व्या वर्षी ते बनले सरपंच!
उष्णता वाढीसाठी प्रत्येक शहराची वेगवेगळी कारणे असल्यामुळे त्यावरील उपायही हे शहरी स्तरावर शोधणे आवश्यक असल्याचे अहवालात म्हटले आहे. जगभरातील १३ हजार ११५ शहरांचा अभ्यास करून हा अहवाल तयार करण्यात आला आहे. भारतातील काही कोरड्या वातावरण असलेल्या शहरांमध्ये आर्दता वाढत असल्याचेही अहवालात म्हटले आहे.
जागतिक उष्णता वाढ दर्शवणाऱ्या अहवालातील पहिली दहा शहरे-
- ढाका
- दिल्ली
- कोलकाता
- बँकॉक
- मुंबई
- कराची
- चेन्नई
- दुबई
- लाहोर
- मनिला