‘भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनात आणलं तर एका क्षणात पाकिस्तान क्रिकेट कोलमडून जाईल’ असे मत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष आणि पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू रमिज राजा यांनी व्यक्त केले आहे. पाकिस्तानच्या सिनेट स्टॅंडिंग कमिटी चा एका बैठकीत ते बोलत होते
रमिज राजा यांनी या बैठकीत पाकिस्तान क्रिकेटचे वास्तव जगासमोर ठेवले आहे. रमिज राजा म्हणतात ‘पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला पन्नास टक्के निधी हा जागतिक क्रिकेट संघटना अर्थात आयसीसी कडून मिळतो. आयसीसीच्या या निधीमुळे पाकिस्तान क्रिकेट तग धरून राहिले आहे. पण आयसीसीला मिळणाऱ्या एकूण उत्पन्नापैकी ९० टक्के उत्पन्न हे भारताकडून मिळते. त्यामुळे आयसीसी स्वतः उत्पन्नासाठी भारतीय बाजारपेठेवर अवलंबून आहे. त्यामुळे भारतीय व्यवसायिक पाकिस्तान क्रिकेट चालवतात असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. अशा परिस्थितीत उद्या जर का भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठरवले की आम्ही पाकिस्तानला कोणत्याही प्रकारचे फंडिंग करणार नाही, तर पाकिस्तानचे क्रिकेट बोर्ड कोलमडून जाईल.’
हे ही वाचा:
पाकिस्तानला मिळणारी मदत तातडीने थांबवा!
मुस्लिम शिक्षकांना वेगळे करून काश्मीरात हिंदू, शीख शिक्षकांची हत्या
कनिष्ठ नेमबाजी स्पर्धेत महिला संघाची सुवर्णकमाई!
…आणि असा घातला त्याने मित्रालाच गंडा
रमिज राजा यांच्या या विधानातून भारताची आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ताकद पुन्हा एकदा जगासमोर आली आहे. एकीकडे भारताचे क्रिकेट बोर्ड हे जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड म्हणून ओळखले जात असतानाच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची हालत मात्र खराब झाली आहे. नुकत्याच तीन देशांनी पाकिस्तान सोबतच्या आपल्या मालिका रद्द केल्या आहेत. तर राजा यांचे हे विधान ऐकून पाकिस्तान मधील एक श्रीमंत गुंतवणूकदार पुढे येऊन असे म्हणाला आहे की ‘जर पाकिस्तानी संघाने आगामी टी-२० विश्वचषकात भारताला हरवले तर तो पाकिस्तान क्रिकेट बोर्डासाठी ब्लँक चेक पाठवून देईल.