भारतीय जनता पार्टीचे ईशान्य मुंबईचे खासदार मनोज कोटक यांनी मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंग चहल यांना उद्देशून एक पत्र लिहिले आहे. मुंबईतील प्रसिद्ध अशा हेरिटेज दर्जाच्या पवई तलावाच्या पाणथळ क्षेत्राचे चेतन आणि संरक्षण करण्याबाबत कोटक यांनी हे पत्र लिहिले आहे. पवईतील हा सुप्रसिद्ध तलाव कोटक यांच्या लोकसभा क्षेत्रात येतो.
पवई तलावाच्या पाणलोट क्षेत्रात भराव घालून सायकल ट्रॅक तयार करण्याचे काम मुंबई महापालिकेने हाती घेतले आहे. मुंबई महापालिकेच्या या कामामुळे पवई तलावाच्या नैसर्गिक सौंदर्यास बाधा तर पोहोचणार आहेच पण जैवविविधतेसही धोका निर्माण होणार आहे. पवईचा तलाव हा एक हेरिटेज दर्जाचे पाणथळ क्षेत्र आहे. त्यामुळे महापालिकेच्या कामाने या क्षेत्राला धोका निर्माण होणार नाही याची खबरदारी महापालिकेने घ्यावी असे या पत्रात कोटक यांनी म्हटले आहे.
हे ही वाचा:
पाकिस्तानला मिळणारी मदत तातडीने थांबवा!
छत्तीसगडमध्ये का सुरु झाला हिंदू-मुसलमान संघर्ष?
NCB वर निशाणा साधण्यासाठी नबाब मलिकना ड्रग्ज माफीयांनी सुपारी दिली आहे काय
तर या पत्रातून कोटक यांनी महापालिकेच्या कामाच्या संदर्भात इतरही काही महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले आहेत. मुंबई महापालिकेची सध्याची आर्थिक स्थिती पाहता या ट्रॅकच्या कामावर शेकडो कोटी रुपये खर्च करणे योग्य ठरणार नाही असे कोटक यांनी म्हटले आहे. त्यामुळे हे काम त्वरित थांबून पूर्वनियोजित असलेल्या पाइपलाईनच्या बाजूच्या जागेवर काम सुरू करावे अशी मागणी कोटक यांनी केली आहे. त्यासोबतच वृक्षतोड झालेल्या झाड्यांच्या जागी नवीन वृक्षारोपण करावे, बिबट्यांच्या वावरासाठी आणि मगरींच्या संवर्धनासाठी आवश्यक ती उपाययोजना करण्यात याव्यात, अशाही मागण्या कोटक यांनी केल्या आहेत.