कोरोनाविरुद्ध लढाईसाठी भारताची तयारी उत्तम झाली आहे. आपण ऑक्सिजन प्लँट्स उभारण्यात वेगाने प्रगती करत आहोत. पीएम केअर फंडाच्या माध्यमातून ११५० पेक्षा अधिक ऑक्सिजन प्लँटनी काम करायला सुरुवात झाली आहे. आता देशातील प्रत्येक जिल्ह्यात पीएम केअर्सच्या मदतीतून बनलेल्या ऑक्सिजन प्लँट्सनी कव्हर झाला आहे. पीएम केअर्सच्या या प्लँट्सना जोडले तर केंद्र, राज्य यांच्या प्रयत्नांतून देशाला किमान ४ हजार नवे ऑक्सिजन प्लँट्स मिळणार आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तराखंड येथील ऑक्सिजन प्लँट्सच्या लोकार्पण सोहळ्यात भाष्य केले.
ते म्हणाले की, या आव्हानाचा मुकाबला देशाने समर्थपणे केला आहे. देशातील रुग्णालये सक्षम होत आहेत. ही सगळ्यांसाठी कौतुकाची बाब आहे.
पंतप्रधान म्हणाले की, कोरोनासारख्या आतापर्यंतच्या सगळ्यात मोठ्या संकटाचा सामना आपण भारतीय ज्या पद्धतीने करतो आहोत, हे जग अगदी बारकाईने बघत आहे. कोरोनाच्या लढाईत भारताने ज्या सुविधा उभारल्या, यामुळे देशाचे सामर्थ्य दिसले. एका टेस्टिंग लॅब वरून आता ३ हजार लॅबचे नेटवर्क तयार झाले आहे. मास्क व पीपीई किट आयात करणारे आपण आता मास्कची निर्यात करतो आहोत.
हे ही वाचा:
उपास करताना पाळाव्या या गोष्टी
कधी कल्पनाही केली नव्हती; लोकआशीर्वादाने पंतप्रधानपदी पोहोचलो!
मुस्लिम शिक्षकांना वेगळे करून काश्मीरात हिंदू, शीख शिक्षकांची हत्या
व्हेन्टिलेटर्सची सुविधा, लसींचे निर्माण, लसीकरण अभियान भारताने करून दाखविले. आपल्या संकल्पशक्तीचे, सेवाभाव, एकजुटतेचे प्रतीक आहे. भारताच्या कोरोनाविरुद्धच्या लढाईत एक आव्हान होते, ते लोकसंख्येचे. शिवाय, भारतातील विभिन्न भूगोलही आव्हान होते. ऑक्सिजनचा पुरवठा, लसी ही आव्हाने देशासमोर येत राहिली. देश या समस्यांशी कसा लढला हे समजून घेणे देशवासियांसाठी महत्त्वाचे आहे.
पंतप्रधान म्हणाले की, ९०० मेट्रिक टन मेडिकल लिक्विड ऑक्सिजन आपल्याकडे तयार होत होता. पण मागणी वाढली तेव्हा हेच उत्पादन १० पट जास्त वाढविले. हे कोणत्याही देशासाठी कल्पनेपलिकडे होते. भारताने हे साध्य करून दाखविले. लिक्विड ऑक्सिजनचे स्थानांतरण करणे हेदेखील आव्हान होते. कोणत्याही टँकरमधून ते नेता येत नाही. खास टँकर हवे असतात. भारतात ऑक्सिजन उत्पादनाचे काम सगळ्यात जास्त पूर्व भारतात होते. पण गरज उत्तरेत आणि पश्चिम भारतात होती. आपण तिथे युद्धस्तरावर काम केले.