27 C
Mumbai
Sunday, November 24, 2024
घरराजकारणवरुण आणि मनेका गांधींची भाजपा राष्ट्रीय कार्यकारिणीतून हकालपट्टी

वरुण आणि मनेका गांधींची भाजपा राष्ट्रीय कार्यकारिणीतून हकालपट्टी

Google News Follow

Related

सुब्रमण्यन स्वामींनाही पक्षाकडून नारळ

उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खिरीच्या घटनांचा निषेध करणाऱ्या भाजपा खासदार वरुण गांधी आणि त्यांची आई मनेका गांधी यांची नावे भाजपच्या ८० सदस्यीय राष्ट्रीय कार्यकारिणीच्या आजच्या ताज्या यादीतून वगळण्यात आली आहेत. याचबरोबर राज्यसभा खासदार सुब्रमण्यन स्वामी यांचेही नाव वगळण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

वरुण गांधी हे कायमच वादग्रस्त खासदार राहिलेले आहेत. यावेळी उत्तरप्रदेशमधील एका मतदारसंघातून भाजपाच्या तिकिटावर निवडून आल्यानंतर उत्तरप्रदेशमधील भाजपच्या सरकारवर टीका करत वरुण गांधी यांनी आपल्या पायावर धोंडा पाडून घेतला आहे. लखीमपूर खिरीमधील कथित शेतकऱ्यांच्या हत्त्येनंतर विरोधक योगी सरकारवर टीका करत असताना, वरुण गांधींनीही विरोधकांच्याच पंक्तीत बसणे पसंत केले आहे.

“यूपीतील इतर जेष्ठ नेते कार्यकारिणीची भाग आहेत. किमान दहा सदस्य उत्तर प्रदेशचे आहेत. त्यांनी (वरूण गांधी) त्यांची उपयुक्तता किंवा प्रासंगिकता गमावली असावी. आम्ही विविध प्रसंगी त्यांची विधाने पाहिली आहेत. शेवटी हा पक्षाचा निर्णय आहे.” असे वक्तव्य भाजपाच्या एका नेत्याने दिल्याचे एएनआयने सांगितले आहे.

हे ही वाचा:

पाकिस्तानला मिळणारी मदत तातडीने थांबवा!

अखेर उघडले दार…

देशभर सुरु आदिशक्तीचा जागर

NCB वर निशाणा साधण्यासाठी नबाब मलिकना ड्रग्ज माफीयांनी सुपारी दिली आहे काय?

केंद्र सरकारने आणलेल्या तीन नवीन शेती कायद्यांविरोधात सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान वरुण गांधी सातत्याने आंदोलनकर्त्यांच्या समर्थनार्थ बोलत आहेत. त्यांची आई मनेका गांधी देखील आंदोलकांच्या बाजूने बोलत आहे. त्याचप्रमाणे सुब्रमण्यम स्वामी, यांनाही त्यांच्या नजीकच्या ट्विट्समुळे पक्षाचे टीकाकार म्हणून पाहिले जात होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
196,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा