32 C
Mumbai
Sunday, December 29, 2024
घरक्राईमनामाबॅगच्या पटट्याने केली एसटी चालकाने आत्महत्या

बॅगच्या पटट्याने केली एसटी चालकाने आत्महत्या

Google News Follow

Related

आपल्या बॅगेच्या पट्टयाच्या सहाय्याने एका एसटी बस चालकाने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना  उदगीर येथे घडली आहे. अहमदरनगर येथे अशीच एक घटना घडली होती. त्याचीच पुनरावृत्ती आता लातूर जिल्ह्याती उदगीर येथे घडली आहे. संजय केसगिरे असं आत्महत्या केलेल्या बस चालकाचे नाव आहे.

संजय केसगिरे यांच्या आत्महत्येचे कारण मात्र समजलेले नाही. या घटनेने उदगीर आगारातील कर्मचाऱ्यांत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

या घटनेबाबत सांगण्यात येते की, उदगीर आगारात एसटी बस थांबलेली असताना एसटी बस चालक संजय केसगिरे यांनी स्वतःच्या बॅगचा पट्टा काढून गळफास घेतला. या घटनेनंतर त्यांना रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र तिथे पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.

अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर बस स्थानकात बसमध्येच ड्रायव्हरने आपलं आयुष्य संपवल्याची अशीच एक घटना याआधी घडलेली आहे. कर्जबाजारीपणातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती समोर आली होती.

 

हे ही वाचा:

बसच्या लोकेशनची यंत्रणा तर बसविली, पण अ‍ॅप सुरूच नाही!

राहुल गांधी राजकारण करण्यासाठी उत्तर प्रदेशमध्ये दाखल

डोंबिवलीत रेल्वे रुळाजवळ आढळला मृतदेह; अपघात की खून?

मुंबईतल्या खाकीमधील कॉन्स्टेबल धावणार लंडन मॅरेथॉनमध्ये!

 

संगमनेर येथील पाथर्डी बस स्थानकातील चालक सुभाष तेलोरे यांनी आपलं आयुष्य संपवलं होतं. मुक्कामी थांबलेल्या बसमध्येच त्यांनी सकाळी गळफास घेतल्याचा आरोप झाला होता. डोक्यावर कर्ज वाढल्याने सुभाष तेलोरे यांनी टोकाचं पाऊल उचलल्याचे म्हटले जात होते.

त्याआधी, कमलेश बेडसे यांनीही कमी पगार आणि तोही वेळेवर मिळत नसल्यामुळे आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले होते. धुळे जिल्ह्यातील साक्री येथे ही घटना घडली होती.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा