27 C
Mumbai
Saturday, November 23, 2024
घरदेश दुनिया... म्हणून ट्रुडो करणार या 'खलिस्तानी' मंत्र्याची हकालपट्टी

… म्हणून ट्रुडो करणार या ‘खलिस्तानी’ मंत्र्याची हकालपट्टी

Google News Follow

Related

कॅनडाचे संरक्षण मंत्री हरजित सज्जन यांना पंतप्रधान जस्टिन ट्रुडो लवकरच पदावरून काढून टाकू शकतात. सज्जन यांच्यावर खलिस्तानी संघटनांशी जवळचे संबंध असल्याचेही आरोप आहेत. सज्जन यांनी कॅनेडियन सशस्त्र दलामधील लैंगिक गैरवर्तनाच्या प्रकरणावर कोणतीही कारवाई न केल्यामुले काढून टाकण्याच्या मागण्या जोर धरत आहेत. सज्जन यांना अकार्यक्षमतेमुळे पदभार सोडावा लागणार असल्याचे तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे.

ऑटोवा सिटिझन मध्ये लिहिले आहे की, सज्जन पुन्हा संरक्षणमंत्री होण्याची शक्यता फार धूसर आहे. अनेकांच्यामते प्रभावहीन असलेले सज्जन हे काही टीकाकारांच्यामते हा पदभार सांभाळण्यासाठी अकार्यक्षमदेखील आहेत.

दरम्यान, ग्लोबल न्यूज या आउटलेटने कॅनेडियन डिफेन्स अँड सिक्युरिटी नेटवर्कचे संचालक स्टीव्ह साईडमन यांच्या हवाल्याने सज्जन यांचा कार्यकाळ “विनाशकारी” असे वर्णन केले. ते पुढे म्हणाले “जर या सरकारने सज्जन यांना पदावर कायम ठेवत असेल तर त्यातून असा संदेश जाईल की त्यांना सैन्यात महिलांची काळजी नाही.

नॅशनल पोस्टच्या स्तंभलेखिका सबरीना मॅडॉनेही असेच मत मांडले, “जर पंतप्रधान जस्टिन ट्रुडो सैन्यातील ही विषारी परंपरा बदलण्याबद्दल थोडेतरी गंभीर असतील, तर त्यांनी ऑक्टोबरमध्ये नवीन संरक्षण मंत्री नेमणे आवश्यक आहे.”

हे ही वाचा:

लखीमपूर खिरीमधील मृतांना सरकारकडून ४५ लाखांची मदत

WHO म्हणतंय, हा आहे भारताचा ‘अमृतमहोत्सव’

काय आहे नार्कोटिक जिहाद?

दुबई एक्सपोमध्ये का झाली भारतातल्या हायपरलूपची चर्चा?

त्या पुढे म्हणाल्या की सज्जन यांनी संस्थेच्या लैंगिक गैरवर्तन प्रकरणात सर्व विश्वासार्हता गमावली आहे.” न्यू डेमोक्रॅटिक पार्टीचे माजी नेते टॉम मुलकेयर यांनी सांगितले आहे की, “संरक्षण मंत्री हरजित सज्जन लष्करातील लैंगिक गैरवर्तनाच्या समस्येचा सामना करण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. ज्या महिला धैर्याने पुढे आल्या आहेत त्यांचा विश्वासघात झाला आहे.”

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
193,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा