24 C
Mumbai
Wednesday, November 27, 2024
घरविशेषरात्री १० पर्यंत नको, हॉटेलची वेळ वाढवा!

रात्री १० पर्यंत नको, हॉटेलची वेळ वाढवा!

Google News Follow

Related

हॉटेल, रेस्टॉरंट, बार, फूड कोर्ट ५० टक्के क्षमतेने सुरू करण्यास शासनाने परवानगी दिली असली तरी वेळेच्या बंधनामुळे व्यवसाय करणार कसा, असा प्रश्न आता हॉटेल असोसिएशनतर्फे उपस्थित केला जात आहे. सध्या असलेली वेळमर्यादा रात्री दीड पर्यंत करावी, अशी मागणी आता जोर धरु लागली आहे. हॉटेल व्यवसाय अडचणीत असताना वेळमर्यादेमुळे वीज बिल, कर्मचाऱ्यांचा पगार यावरील खर्चाचा आर्थिक भुर्दंड वाढलेला आहे. त्यामुळेच आता असोसिएशनने मुख्यमंत्री आणि पर्यटनमंत्री यांच्याकडे वेळ वाढविण्याची मागणी केलेली आहे.

लॉकडाउनचा मोठा फटका हॉटेल व्यवसायाला बसला आहे. त्यामुळे पुन्हा उभारी घेण्यासाठी बराच कालावधी जाईल, असेही हॉटेल व्यावसायिकांचे म्हणणे आहे. सरकारने हॉटेल व्यवसायाबाबत घेतलेल्या निर्णयामुळे व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे. परंतु अजूनही वेळमर्यादा असल्यामुळे अनेक गोष्टींवर बंधने आहेत. तसेच दिवसापेक्षा रात्री अधिक ग्राहक हॉटेलमध्ये येत असल्याचे मालकांचे म्हणणे आहे.

५० टक्के क्षमतेने हॉटेल चालवायचे आहे. १०० टक्क्यांमध्ये ६० टक्के टेबल फुल होत होते. आता ५० टक्क्यांमध्ये ५० टक्के ग्राहकांवरच व्यवसाय करावा लागणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांची गरज कमी झाली असून केवळ एकाच पाळीत काम चालत असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे. दिवसभरात ५० टक्के, तर रात्री ५० टक्के व्यवसाय होतो. मात्र, वेळेच्या बंधनामुळे रात्रीच्या व्यवसायावर पाणी सोडावे लागत असल्याची खंत हॉटेल व्यावसायिक व्यक्त करत आहेत. काहींनी हॉटेले सुरूही केली नाहीत. लोकांमधील करोनाची भीती संपलेली नाही. त्यामुळे खर्च वाढवण्यापेक्षा हॉटेल बंद ठेवणे फायदेशीर असल्याचेही हॉटेल मालक सांगतात.

हे ही वाचा:

शिवसेनेचा सत्ताग्रह! ठाणे महापालिकेत गांधींचा विसर

‘आगामी सरकार बनविण्यासाठी नव्हे; तर देश घडविण्यासाठी सरकार चालवले पाहिजे’

लालबहादूर शास्त्री एक सालस राजकारणी

शहरांमधील कचऱ्याचे डोंगर नष्ट करणार

सकाळी सात ते रात्री १० पर्यंत सध्याची वेळ आहे. परंतु अनेकदा रात्रीच्या जेवणासाठी लोक दहा वाजता येतात, त्यामुळे ग्राहकांची सोय बघणेही आता गरजेचे असल्याचे असोसिएशनचे म्हणणे आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
199,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा