30 C
Mumbai
Saturday, November 23, 2024
घरराजकारणपंजाबमध्ये कॅप्टन स्वतःची वेगळी 'इनिंग' सुरु करणार

पंजाबमध्ये कॅप्टन स्वतःची वेगळी ‘इनिंग’ सुरु करणार

Google News Follow

Related

पंजाबच्या मुख्यमंत्रिपदावरून त्यांची हकालपट्टी करण्यात आल्यानंतर आणि काँग्रेसने त्यांचा “अपमान” केल्याच्या दोन आठवड्यांनंतर, कॅप्टन अमरिंदर सिंह आपला स्वतःचा राजकीय पक्ष सुरू करणार असल्याचं वृत्त द इंडियन एक्सप्रेसने दिले आहे.

अमरिंदर यांच्या चमूतील सूत्रांनी द इंडियन एक्सप्रेसला सांगितले की, नव्या संघटनेत त्यांच्याकडे नवजोतसिंग सिद्धू (पंजाब काँग्रेसचे प्रमुख) यांना विरोध करणारे नेते असतील. “नवीन पक्षाचे संविधान तयार केले जात आहे. आम्ही चार नावांवर चर्चा करत आहोत. आत्तासाठी, आम्ही पंजाब विकास पार्टी (पीव्हीपी) हे नाव निश्चित केले आहे. नावावर एकमत आहे पण ते अद्याप अंतिम नाही.” असं सूत्रांनी सांगितलं.

दरम्यान, देहरादूनमध्ये पंजाबचे प्रभारी एआयसीसीचे सरचिटणीस हरीश रावत यांनी अमरिंदर यांचा अपमान झाल्याची टिप्पणी फेटाळून लावली आणि म्हटले की काँग्रेसने त्यांना नेहमीच “सन्मान” दिला. माजी मुख्यमंत्र्यांनी गुरुवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत दिल्लीत झालेल्या बैठकीनंतर अमरिंदर यांच्या “सेक्युलर” असण्यावरवर रावत यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

गुरुवारी अमरिंदर म्हणाले होते की ते काँग्रेस सोडतील पण भाजपमध्ये जाणार नाहीत. त्यांनी असेही म्हटले होते की, पुढील वर्षी होणाऱ्या पंजाब विधानसभेच्या निवडणुकीत सिद्धू यांच्या विरोधात ते एक मजबूत उमेदवार उभा करतील, ज्याच्या तीव्र विरोधामुळे सिंग यांची हकालपट्टी झाली.

हे ही वाचा:

शहरांमधील कचऱ्याचे डोंगर नष्ट करणार

दुबई एक्प्सोमध्ये ‘मुक्त, संधी आणि वाढ’ ही भारताची थीम!

“बापूंचे जीवन प्रत्येक पिढीसाठी मार्गदर्शक” – पंतप्रधान मोदी

राम मंदिर ठरतंय ‘दुबई एक्सपो’ चा आकर्षण बिंदू

सूत्रांनी सांगितले की, अमरिंदर यांनी यापूर्वी गांधी जयंतीला त्यांच्या समर्थकांची बैठक घेण्याचे ठरवले होते, परंतु काही कारणास्तव ही बैठक लांबली आहे. “आम्ही लवकरच बैठक घेऊ. या बैठकीत अनेक वरिष्ठ नेते सामील होण्याची अपेक्षा आहे.” असं सूत्रांनी सांगितलं.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
194,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा