23 C
Mumbai
Thursday, December 26, 2024
घरविशेष'लोकांना सांगा मी क्रांतिकारी होतो'... सरदार उधम चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

‘लोकांना सांगा मी क्रांतिकारी होतो’… सरदार उधम चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

Google News Follow

Related

महान क्रांतिकारी सरदार उधम सिंग यांच्या जीवनावर आधारित ‘सरदार उधम’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. काल म्हणजेच ३० सप्टेंबर रोजी या चित्रपटाचे ट्रेलर प्रदर्शित झाले असून त्याला प्रेक्षकांची भरभरून पसंती मिळताना दिसत आहे. येत्या १६ ऑक्‍टोबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. ॲमेझॉन प्राईम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांना हा चित्रपट बघता येणार आहे.

सरदार उधम सिंग हे भारताच्या इतिहासातील एक महान देशभक्त ओळखले जातात. १९१९ साली जालियनवाला बाग हत्याकांड घडवणाऱ्या क्रुरकर्मा जनरल डायरचा उधम सिंग यांनी वध केला होता. १९४० साली म्हणजेच जालियनवाला बाग हत्याकांडाच्या तब्बल २१ वर्षानंतर उधम सिंग यांनी जनरल डायरला यमसदनी धाडले. इंग्लंडच्या भूमीवर जाऊन त्यांनी जनरल डायरला गोळ्या घातल्या होत्या.

हे ही वाचा:

‘डी’ गँगचे कारनामे उघडकीस आणण्यासाठी एनसीबी तत्पर

मुख्य सचिव कुंटे आणि पोलिस महासंचालक संजय पांडेंना सीबीआयचे बोलावणे

महिला निदर्शकांबाबत तालिबानने काय केले?

शशी थरूरदेखील सिब्बल यांच्या समर्थनार्थ मैदानात

त्यांची हीच शौर्यगाथा ‘सरदार उधम’ या चित्रपटाच्या माध्यमातून उलगडण्याचा प्रयत्न केला गेला. हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीचा अभिनेता विकी कौशल या चित्रपटात उधम सिंग यांच्या मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तर प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक शुजित सरकार यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या अडीच मिनिटांच्या ट्रेलरला प्रेक्षकांची पसंती मिळताना दिसत आहे. २४ तासांपेक्षा कमी वेळात ८० लाखांपेक्षा अधिक लोकांनी या चित्रपटाचे ट्रेलर युट्युबवर पाहिले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा