30 C
Mumbai
Sunday, December 29, 2024
घरदेश दुनियापंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात, नद्यांचे महत्त्व ओळखा!

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात, नद्यांचे महत्त्व ओळखा!

Google News Follow

Related

जागतिक नदी दिवसानिमित्त पंतप्रधानांनी केली ‘मन की बात’

प्रत्येक सप्टेंबर महिन्याचा चौथा रविवार हा जागतिक नदी दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ मधून नदी दिनाचे महत्त्व सांगितले आणि प्रत्येक भारतीयाने नद्यांचा उत्सव साजरा केला पाहिजे असे आवाहनही केले.

मोदी म्हणाले की, पिबन्ती नद्ध:  स्वयमेव नाम्भः या श्लोकात हेच सांगितले आहे की, नद्या आपले पाणी स्वतः पित नाहीत तर परोपकारासाठी देतात. नदी ही भौतिक वस्तू नाही. त्यामुळे आपण नदीला आई म्हणतो. अनेक उत्सव, सण नदी मातेच्या किनारीच होतात. माघ महिन्यात देशात अनेक लोक गंगा किंवा अन्य नदीकिनारी कल्पवास करतात. आंघोळ करताना नदीचे स्मरण आज भलेही केले जात नसेल पण ही परंपरा होती. संत सज्जनही नदीसाठी खूप काही करतात. या कामाला समर्पित केलेल्या सगळ्यांचे कौतुक आहे. नदीच्या किनारी राहणाऱ्या सगळ्यांनी एकदा नदी उत्सव साजरा केला पाहिजे.

गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन सन्निधीं कुरू असा श्लोक घराघरात लहानांना पाठ करायला लावला जात असे. विशाल भारताचे चित्र मनात ठसत असे. नदीप्रती आपुलकी निर्माण होत असे. नदीच्या प्रती आस्था निर्माण होत होते. नद्यांच्या महिमा सांगतो. नदी प्रदूषित का होतात असा प्रश्न विचारला जातो, हे योग्यच आहे. आपल्या परंपरांमुळेही ते होते. पण नदी सफाई व प्रदूषण मुक्ती सगळ्यांच्या प्रयत्नांतून होऊ शकते. नमामि गंगे हा प्रकल्पही असाच आहे. जनजागृतीच्या माध्यमातून हे होते. आज ई ऑक्शन चालते. इलेक्ट्रॉनिक लिलाव होतो. मला मिळणाऱ्या भेटवस्तूंचा लिलाव करून त्यातून गोळा होणारा पैसा नमामि गंगे कार्यक्रमाला दिला जातो.

मोदी यांनी नदीबद्दल आत्मियता दाखविणारे एक उदाहरण दिले. ते म्हणाले की, मिळनाडूतील तिरुवन्नमलाई या जिल्ह्यात नागा नदी सुकली होती. त्यामुळे जलस्तर खाली आला होता. पण महिलांनी नदीला पुनरुज्जीवीत केले. लोक जमले लोकांच्या सहभागातून नदी पुन्हा तयार झालीय आज त्या नदीत भरपूर पाणी आहे. नदी भरूभरून वाहते तेव्हा मन प्रसन्न होते. साबरमतीतटी साबरमती आश्रम होता ती नदी मात्र सुकली होती. ६-८ महिने पाणीच नव्हते नर्मदा नदी साबरमती नदीला जोडल्यामुळे साबरमती नदीत आता भरपूर पाणी दिसते.

हे ही वाचा:

हिम्मत असेल तर यावेळी माझा कोल्हापूर दौरा अडवून दाखवा, सोमैय्यांचे आव्हान

हिंसेला कारणीभूत असलेल्या तृणमूलच्या ममता विश्वशांती संमेलनासाठी का उत्सुक?

भायखळा तुरुंगात तब्बल ३९ कैद्यांना झाला कोरोना

मुंबई सेंट्रल स्टेशनमध्ये आता आरामात राहा…

मोदी यांनी यावेळी सियाचेनमध्ये वजा तापमान असलेल्या अत्यंत थंड प्रदेशातही १५ हजार फुटांपर्यंत शिखर सर करणाऱ्या दिव्यांगांचे कौतुक केले. या ८ दिव्यांगांनी केलेल्या कामगिरीची त्यांनी विशेष दखल घेतली व ते सर्वांसाठी प्रेरणादायी आहेत, असे सांगितले. त्या आठजणांची नावेही पंतप्रधानांनी सांगितली.

उत्तर प्रदेशमध्येही दिव्यांगांबाबत असाच एक प्रयत्न होतो याची दखल घेत बरेलीत दिव्यांग मुलांना नवी वाट दाखविणाऱ्या दीपमाला पांडे यांचे कौतुक पंतप्रधानांनी यावेळी केले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा