महाराष्ट्र उत्पादन शुल्क विभागाने गोवा आणि दमणमधून महाराष्ट्रात प्रवेश करणारी तस्करीयुक्त दारू शोधण्यासाठी ४० श्वानांचे पथक तयार करण्याची योजना आखली आहे. उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमप यांनी नुकतीच ही माहिती माध्यमांना दिली. श्वान पथकाचा समावेश करण्याची योजना तयार केली असून, हा प्रस्ताव मंजुरीसाठी मंत्रालयात आता पाठविण्यात आलेला आहे. तसेच हे श्वान पथक गोवा आणि दमणच्या आजूबाजूच्या उत्पादन शुल्क सीमा तपासणी चौक्यांवर तैनात केले जातील.
श्वानपथकांच्या मदतीने तस्करी केलेले मद्य जप्त करण्यात येईल. तस्करीच्या दारूमुळे राज्याला होणाऱ्या महसुली नुकसानास आळा घातला जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.
ते पुढे म्हणाले की, कमी अबकारी दरामुळे, महाराष्ट्राच्या तुलनेत गोवा आणि दमणमध्ये दारूचे दर तुलनेने कमी आहेत. किमतीतील फरकाने या दोन ठिकाणांहून दारूची तस्करी एक आकर्षक प्रस्ताव बनली आहे. राज्यात येणाऱ्या गाड्यांची संख्या वाढली आहे आणि प्रगत मॉडेलमध्ये बरीच क्षेत्रे आहेत जिथे मद्य लपवता येते. त्यामुळे श्वानांच्या मदतीने आता तस्करी रोखण्यात येईल. श्वानांना वासाचे ज्ञान हे खूप चांगले असते. हुंगण्याच्या माध्यमातून श्वान मद्य कुठे लपवले आहे याचा शोध घेतील.
गोव्याहून सिंधुदुर्गमध्ये येण्यासाठी आठ ते दहा मार्ग आहेत. उत्पादन शुल्क विभागाकडे मनुष्यबळ कमी आहे. तसेच दमण ते महाराष्ट्रासाठी सहा मार्ग आहेत. त्यामुळेच श्वानांच्या मदतीच्या सह्यायाने आता मद्याची तस्करी पकडण्याचा निर्णय उत्पादन शुल्क विभागाने घेतलेला आहे.
हे ही वाचा:
राज्य सरकारची मागणी फेटाळली; जिल्हा परिषद निवडणुका ठरल्याप्रमाणेच…
दिल्ली गँगवॉरमागे गोगी – टिल्लू गॅंगचे हाडवैर
आधी मराठी शाळा तर वाचवा, मग ‘केंब्रिज’कडे वळा!
महाराष्ट्र, कोल्हापूरचे संघ उपांत्य फेरीत; कोल्हापूरच्या मुलांचा संघ पराभूत
सहआयुक्त (उत्पादन शुल्क) यतीन सावंत यासंदर्भात अधिक बोलताना म्हणाले, ” श्वानांची खरेदी झाल्यानंतर त्यांना मद्य हुंगण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.” प्रथम कुत्र्यांना प्रशिक्षण देतील आणि नंतर त्यांच्यासाठी सिंधुदुर्ग आणि पालघर जिल्ह्यांत केनेल बांधतील. बिहार आणि ईशान्येकडील काही राज्यांमध्ये आधीच दारू शोधण्यासाठी श्वान पथके आहेत, असेही ते म्हणाले. राज्याच्या सर्व सीमांवर २४ चेक पोस्ट आहेत, सध्या उत्पादन शुल्क कर्मचारी फक्त ११ पोस्टवर तैनात आहेत.