24 C
Mumbai
Sunday, November 24, 2024
घरदेश दुनियामर्केल यांच्यानंतर जर्मनीच्या चॅन्सेलर कोण?

मर्केल यांच्यानंतर जर्मनीच्या चॅन्सेलर कोण?

Google News Follow

Related

राष्ट्रीय निवडणुकीच्या दोन दिवस आधी, जर्मनीच्या राजकीय पक्षांनी त्यांच्या समर्थकांना मतदान केंद्रांवर आणण्याची आणि तटावरील मतदारांना खेचून घेण्यासाठी तयारी केली आहे. १६ वर्षांच्या सत्तेनंतर चॅन्सेलर अँजेला मर्केल यांच्यानंतर कोण यशस्वी होईल हे या निवडणुकीतून ठरणार आहे.

मर्केलच्या पक्षाने, आर्मिन लॅशेटला चान्सलरशिपचे उमेदवार म्हणून घोषित केले आहे. अलिकडच्या आठवड्यांत झालेल्या मतमोजणी चाचण्यांमध्ये थोडासा फायदा झाला आहे. परंतु ते अर्थमंत्री ओलाफ शोल्झ यांच्या नेतृत्वाखालील सोशल डेमोक्रॅट्सपेक्षा थोडे पिछाडीवर आहेत.

तज्ञांचे म्हणणे आहे की या वर्षीची जर्मन निवडणूक अधिक अटीतटीची आणि नेहमीपेक्षा कमी सोपी असेल. याचे एक कारण म्हणजे बहुतेक उमेदवार मतदारांसाठी अज्ञात आहेत.

“ही नक्कीच सर्वात कंटाळवाणी निवडणूक नाही.” लीपझिग विद्यापीठातील राजकीय शास्त्रज्ञ हेंड्रिक ट्रॅगर म्हणाले. ” या पूर्वीच्या निवडणुकांमध्ये असे होते ज्यात अँजेला मर्केल सत्ताधारी म्हणून निवडणुकीला उभ्या होत्या आणि त्या फक्त कोणाबरोबर शासन करणार हा प्रश्न होता.”

यावेळी, मर्केलच्या पक्षाने आपल्या पारंपारिक मतदारांना प्रेरित करण्यात अयशस्वी ठरला आहे. त्यामुळेच आतापर्यंत नॉर्थ राइन-वेस्टफेलिया राज्याचे मुख्यमंत्री लॅशेट यांना राजकीय बळ देण्यात अपयशी ठरला आहे.

हे ही वाचा:

… म्हणून ठाण्यात भरले खड्ड्यांचे प्रदर्शन!

पाकिस्तान, तात्काळ पीओके सोडा!

अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदाप्रमाणेच ऑलिम्पिक संघटनेत दोन-दोन वर्षे खजिनदार

आरोग्य विभागाच्या महाभरतीचा महागोंधळ!

फोर्सा या मतदान कंपनीचे पीटर मॅटुशेक म्हणाले, “हा मतदार लॅशेट हा पक्षाचा चेहरा असताना देखील पक्षाला मत देईल का हा मुख्य प्रश्न आहे.” सत्ताधारी ब्लॉकची शेवटची मोठी रॅली म्युनिकमध्ये होईल, तर सोशल डेमोक्रॅट्स कोलोनमध्ये एक कार्यक्रम आयोजित करत आहेत. ग्रीन्स जवळच्या ड्यूसेल्डॉर्फमध्ये त्यांची रॅली काढतील.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
195,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा