अफगाणिस्तानमध्ये पाकिस्तानची भूमिका आणि दहशतवादामागे असलेला पाकिस्तानचा हात हे क्वाड शिखर परिषद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या द्विपक्षीय चर्चेमध्ये महत्वाचे मुद्दे होते, असे परराष्ट्र सचिव हर्षवर्धन शृंगला यांनी सांगितले. वॉशिंग्टनमध्ये पत्रकार परिषदेत पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा दिल्याबद्दलच्या प्रश्नाला उत्तर देताना शृंगला म्हणाले की, भारत आपल्या शेजारील राष्ट्रांमध्ये आणि त्याही पलीकडे ज्या समस्यांना तोंड देत आहे त्यामध्ये पाकिस्तानची भूमिका खरोखरच संतापजनक आहे.
“द्विपक्षीय चर्चा आणि क्वाड शिखर परिषद दोन्हीमध्ये, एक स्पष्ट संदेश होता की अफगाणिस्तानमध्ये पाकिस्तानची भूमिका अधिक काळजीपूर्वक पहावी, तपासावी आणि त्याचे निरीक्षण करावे. दहशतवादाच्या मुद्द्यावर पाकिस्तानची भूमिका ठरवावी लागेल आणि निश्चितपणे ते क्वाड किंवा इतर भागीदारांनाच करावे लागेल.” असंही ते म्हणाले.
हे ही वाचा:
पाकिस्तान, तात्काळ पीओके सोडा!
देवी पावली…अखेर महाराष्ट्रातील मंदिरे उघडणार
…म्हणून अमिताभ बच्चन यांनी लावला रोहित शर्माला व्हिडिओ कॉल
४ ऑक्टोबरपासून शाळांमध्ये होणार किलबिलाट
भारत आणि अमेरिकेने अफगाणिस्तानमध्ये इस्लामाबादच्या भूमिकेबद्दल चिंता व्यक्त केली आहे, असे श्री शृंगला म्हणाले, दोन्ही देशांनी अफगाणिस्तानातील दहशतवादाचा मुकाबला करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. गुरुवारी एका पत्रकार परिषदेदरम्यान, शृंगला यांनी माहिती दिली की अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांनी स्वतःहून पाकिस्तानचा मुद्दा उपस्थित केला आहे. त्यांनी दहशतवादामध्ये पाकिस्तानच्या भूमिकेचा उल्लेख केला आहे. पंतप्रधान मोदींशी पहिल्यांदा झालेल्या भेटीदरम्यान त्यांनी पाकिस्तानला दहशतवादी गटांना पाठिंबा देणे बंद करण्यास सांगितले आहे. पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे उपराष्ट्रपती यांच्यातील चर्चेदरम्यान पाकिस्तानला प्रोत्साहन देणारा तालिबानचा मुद्दा उपस्थित झाला का? असा प्रश्न विचारल्यावर म्हणाले, “हॅरिस यांनी पाकिस्तानात दहशतवादी गटांची उपस्थिती मान्य केली आहे.