30 C
Mumbai
Sunday, November 24, 2024
घरविशेषनितीन गडकरी यांनी केले महाराष्ट्रातील २२ महामार्गांचे भूमिपूजन

नितीन गडकरी यांनी केले महाराष्ट्रातील २२ महामार्गांचे भूमिपूजन

Google News Follow

Related

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पुण्यातील कात्रज येथे तब्बल २२ महामार्गाच्या कामांचे भूमिपूजन केले आणि या कामांचा लोकार्पण सोहळाही पार पडला. हे २२ महामार्ग २२१५ कोटी रुपयांचे असतील. २२१ किमीचे हे महामार्ग आहेत. ईपीसी आणि बीओटी तत्त्वावर महामार्गांचा विकास करण्यात येणार आहे. पुण्याला मुंबई,रायगड,सातारा, सोलापूर,अहमदगर,नाशिक जोडणाऱ्या रस्त्यांचा याद्वारे विकास करण्यात येत आहे.

नितीन गडकरी यांनी या भूमिपूजन समारंभात या विविध महामार्गांच्या कामाची माहिती दिली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, खा. गिरीश बापट, खा. सुप्रिया सुळे, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, महापौर मुरलीधर मोहोळ उपस्थित होते.

ज्या कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा झाला त्यांची यादी-

  • न्हावरा ते आंदळगाव या ४८.४५ कि.मी चे ३११.८६ मार्गाचं काम पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. यामुळे नाशिक आणि पुणे शहरातील वाहतूक सुरळीत होणार आहे.
  • कात्रज जंक्शनवर १.३२६ किमी लांबीच्या १६९ कोटींचा खर्च करुन उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे.
  • बेल्हे शिरुर सेक्शनच्या चौपदरीकरणाचं आणि विकासाचं काम २७.०३ कोटी रुपयांचा खर्च करुन करण्यात येणार आहे. या प्रकल्पाची लांबी ३९ कि.मी आहे.
  • शिक्रापूर न्हावरा सेक्शनचं काम पूर्ण झाले आहे. ४६.४६ कोटी रुपयांच्या २८ किलोमीटर लांबीच्या टप्प्याच्या चौपदरकीरणाचं काम पूर्ण झालं आहे. यामुळे शिक्रापूर आणि न्हावरा या दोन्ही क्षेत्रातील एमआयडीसी जोडल्या जातील आणि अहमदनगर आणि मराठवाडा जोडला जाणार आहे.
  • पुणे नाशिक शिर्डी ही तिन्ही शहर राष्ट्रीय महामार्ग ६० ने जोडला आहे. मंबई आग्रा आणि मुंबई बंगळुरु महामार्गाला हा जोडण्याचं काम करण्यात येत आहे.
  • इंद्रायणी नदी ते खेड या विभागात १८ किलोमीटरच्या टप्प्याच्या विकासासाठी १२६९ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. चारपदरी महामार्गाचं सहापदरीकरण करण्यात येणार आहे.
  • खेड घाट ते नारायणगाव रस्त्याची पूनर्रचना करण्यासाठी २८५ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.
  • पुणे ते शिरुर महामार्गाचा विकास करण्यात येणार आहे.
  • चाकण शिक्रापूर सेक्शनच्या चौपरीकरणाचं काम करण्यात येणार आहे. हा प्रकल्प बीओटी तत्त्वावर करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी १०१५ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. या महामार्गाच्या विकासामुळे पुणे अहमदनगर रस्त्यावरील वाहतूक वेगवान होणार आहे. तळेगाव चाकण येथील एमआयडीसी जुन्या पुणे मुंबई महामार्गाला जोडली जाईल.
  • शिंदेवाडी फाटा ते वरंधा या ५९ किलोमीटर लांबीच्या प्रकल्पासाठी ३१० कोटी रुपयांचा खर्च येणार आहे.
  • उंडवडी कडे पठार ते बारामती फलटण सेक्शनसाठी३६५  कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. यामुळे पुणे, सातारा आणि अहमदनगर जोडलं जाईल.
  • न्हावरा चौफुला सेक्शनच्या विकासासाठी २२० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. या प्रकल्पाची लांबी २५ किलोमीटर आहे. शिक्रापूर न्हावरा औद्योगिक क्षेत्राला याचा फायदा होणार आहे.
  • केंद्रीय रस्ते निधी अंतर्गत येत्या काळात १७ रस्ते योजना सुरु होत आहेत. याची लांबी ११६ किमी असून याचा खर्च १३४ कोटी रुपये आहे.
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
195,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा