राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) विरोधात गीतकार जावेद अख्तर यांच्या कथित “खोट्या आणि अपमानास्पद” वक्तव्याबद्दल मुंबईतील वकीलांनी त्यांना बुधवारी कायदेशीर नोटीस पाठवली आणि त्यासाठी त्यांना माफी मागण्यास सांगितले. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अख्तरने ही कथित टिप्पणी केली होती. वकील संतोष दुबे यांनी असेही म्हटले की जर गीतकाराने “बिनशर्त लिखित माफी” सादर केली नाही आणि नोटीस प्राप्त झाल्याच्या सात दिवसांच्या आत आपली सर्व विधाने मागे घेतली नाहीत तर ते अख्तर यांच्या विरोधात तक्रार दाखल करतील आणि १०० कोटी रुपयांची भरपाई मागतील. तसेच फौजदारी खटलाही दाखल होणार असल्याचे म्हटले आहे.
जावेद अख्तर यांनी नुकत्याच दिलेल्या एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये तालिबान आणि हिंदू अतिरेक्यांसारखे असल्याचा दावा केला होता. वकिलाने नोटीसमध्ये दावा केला आहे की, अशी विधाने करून अख्तरने भारतीय दंड संहितेच्या कलम ४९९ (मानहानी) आणि ५०० (बदनामीसाठी शिक्षा) अंतर्गत गुन्हा केला आहे.
हे ही वाचा:
… म्हणून आसाममध्ये जाळली गेंड्यांची शिंगे!
किरीट सोमय्या यांचे मूल्य ५५० कोटी रुपये
जागतिक पातळीवर कोरोना रुग्णसंख्येत घट!
नवज्योत सिद्धू मुख्यमंत्री होऊ नयेत यासाठी कोणतेही बलिदान द्यायला मी तयार
वकिलांच्या नोटीसमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, अशी विधाने करून जावेद अख्तर यांनी भारतीय दंड संहितेच्या कलम ४९९ (मानहानी) आणि ५०० (बदनामीसाठी शिक्षा) अंतर्गत गुन्हा केला आहे. याआधी शिवसेनेने संघ आणि विहिंपची तुलना तालिबानशी करणे हिंदु संस्कृतीचा अपमान असल्याचे म्हटले होते. एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत जावेद अख्तर म्हणाले होते, ‘तालिबानप्रमाणे इस्लामिक स्टेट निर्माण करू इच्छित आहे. त्याचप्रमाणे येथे काही लोक आहेत ज्यांना हिंदु राष्ट्र निर्माण करायचे आहे. या लोकांची मानसिकता सारखीच आहे. मग ते हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन किंवा ज्यू असो. तालिबान जे करत आहे ते रानटी आहे. तसेच जे आरएसएस, विहिंप आणि बजरंग दलाचे समर्थन करतात तेही तसेच आहेत.